जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील (Assembly Election) महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रताप नगर येथील रत्ना जैन प्राथमिक विद्यामंदिर जळगाव शहरातील येथील केंद्रावर जाऊन त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी सकाळी लवकर जाऊनच आमदार सुरेश भोळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जनतेसमोर विकासाच्या मुद्द्यावर गेलो असून जनता मला तिसऱ्यांदा आशीर्वाद देईल असा विश्वास आहे. जास्तीत जास्त मतदान करा, असं आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे. पत्नी शालिनीताई विखे पाटील, मुलगा सुजय विखे, सुनबाई धनश्री विखे यांच्यासह परिवाराने मतदान केलं आहे. शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात मतदान केलं आहे. मतदानानंतर विखे पाटलांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
माकपचे नेते आणि सोलापूर शहर मध्यचे उमेदवार नरसिया अडम यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. नरसय्या आडम यांच्या पत्नी कामिनी आडम, मुलगा निलेश, मुलगी निलिमा आणि सून रोहिणी यांनी एकत्रित मतदान केलं आहे. नरसय्या आडम हे सोलापूर शहर मध्य मधून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
डोअर टू डोअर प्रचार अन् फ्री बसेस, भाजपच्या विजयासाठी RSS ने लावली संपूर्ण ताकद
आमदार बच्चू कडू काही वेळातच आपल्या कुटूंबासह बजावणार मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करण्यापूर्वी पत्नी डॉ नयना कडू यांनी बच्चू कडू यांचं औक्षण केलं आहे. यावेळी नयना कडू यांनी बच्चू कडू यांना विजयाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. बच्चू कडू हे पाचव्यांदा विधानसभा निवडणूकिला सामोरे जात आहेत. बच्चू कडू हे सलग चार वेळा अचलपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. या निवडणुकीत बच्चू कडू यांच्या विरोधात काँग्रेसचे बबलू देशमुख, आणि भाजपचे प्रवीण तायडे निवडणूक रिंगणात आहेत.