महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी (Maharashtra Assembly Election 2024) आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. नोव्हेंबर २० रोजी म्हणजेच आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला (Voting) प्रारंभ झाला आहे. ही मतदान प्रक्रियासायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणं शक्य आहे.
आज 20 नोव्हेंबर, विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी मतदानाचा दिवस आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान करता येईल. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलंय.
राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी राज्यभरामध्ये तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. तर संपूर्ण राज्यात 1 लाख 427 मतदान केंद्र देखील सज्ज करण्यात (Assembly Election 2024) आलेली आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण 4 हजार 136 उमेदवार आहेत. राज्यातील एकूण 9.7 कोटी मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
एकूण मतदारांमध्ये 3771 पुरूष आणि 363 महिला तर अन्य 2 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आज 288 मतदारसंघात सुमारे 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 5 कोटी 22 हजार 739 आणि महिला मतदार 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 इतके आहेत, तर 6 हजार 101 तृतीयपंथी मतदार आहेत.
मतदारांना सुलभतेने मतदान करता यावं, यासाठी राज्यात मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण करण्यात आलंय. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदान केंद्र आहे. पुण्यात एकूण 8 हजार 462 मतदान केंद्र आहेत. तर मुंबई उपनगरात 7 हजार 579 मतदान केंद्र आहेत. यंदा राज्यामध्ये मुख्य मतदान केंद्र 1 लाख 186 आहेत. त्यापैकी शहरी भागामध्ये 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 मतदान केंद्र आहे. मतदान प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होवू नये, म्हणून निवडणूक आयोग बारकाईने लक्ष ठेवून आहे.