महाराष्ट्रात मतदानापूर्वी भाजपने बिटकॉइन घोटाळा पुढे आणला. या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून ज्यात सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आवाज असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे नेते बिटकॉइन घोटाळ्यात सामील असून निवडणूक प्रचारात त्यातून मिळणारी कमाई वापरली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
दरम्यान, या प्रकारावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मौन सोडले आहे. सुप्रिया सुळे यांचाच ऑडिओ क्लिपमध्ये असलेला आवाज हा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पवार म्हणाले,सुप्रिया माझी बहीण असून मी तिचा आवाज ओळखतो. आज सकाळी काटेवाडी येथे अजित पवार यांनी मतदान केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांनी यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर दिले.
निवडणुकीमुळे अनेक ठिकणी एसटी बसेस रद्द, प्रवाशांची प्रचंड गैरसोय
पवार म्हणाले, बीटकॉईन घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी. या प्रकरणी संपूर्ण सत्य लोकांसमोर यायला हवे. पवार म्हणाले, या निवडणुकीत या लोकसभे प्रमाणे देखील माझ्या समोर लढणारे बारामतीतील माझे कुटुंबीय आहे. त्यामुळे ही लढाई अवघड आहे. अजित पवार ऑडिओ क्लिपबाबत म्हणाले की, ‘क्लिपमध्ये जे काही आहे, ते मला माहित आहे. मी या लोकांसोबत काम केलं आहे. त्यातली एक माझी बहीण आहे. मी त्यांचा आवाज ओळखतो ज्यांच्याबरोबर मी दीर्घकाळ काम केले आहे. या संदर्भात चौकशी करून योग्य पुराव्याच्या आधारे कारवाई केली जाईल, असे पवार म्हणाले.
अजित पवार यांनी काटेवाडी येथे मतदान केल्यावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबाद व्यक्तव्य केलं. अजित पवार म्हणाले, महायुतीचं सरकार राज्यात येणार आहे. आम्ही सर्व निवडून आलेले आमदार व नेते निवडणुकीच्या निकालानंतर एकत्र बसून चर्चा करू. या चर्चेतून मुख्यमंत्र्याची निवड करू.