10.9 C
New York

ST Bus : निवडणुकीमुळे अनेक ठिकणी एसटी बसेस रद्द, प्रवाशांची प्रचंड गैरसोय

Published:

नागपूर – जिल्ह्यातील मतदान केंद्रांपर्यंत पोलिंग पार्टी व निवडणूक साहित्य पोहोचून देण्यासाठी एसटी बसेसची (ST Bus) सेवा घेण्यात येत आहे. २३४ बसेस निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असल्याने एसटीच्या ८८४ नियमित फेऱ्या नागपूर विभागातील रद्द करण्यात आल्या. यामुळे चा सामना करावा लागला.

नागपूर ग्रामीण क्षेत्रातील सर्व सहाही मतदार संघांतील मतदान केंद्रावर कर्मचारी व इव्हीएम मशीन पोचविण्यासाठी महामंडळाकडून बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परिणामी फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. सावनेर आगाराकडून सोडण्यात येणाऱ्या सर्वाधिक १९२ फेऱ्या रद्द राहिल्या. याशिवाय घाटरोड आगारातून सुटणाऱ्या १३३, गणेशपेठ ३०, उमरेड ११७, काटोल १२१, रामटेक १०२, इमामवाडा ८६ आणि वर्धमाननगर आगारातून सुटणाऱ्या १०३ बसफेऱ्या आज रद्द राहिल्या.

बसेसची संख्याच कमी असल्याने प्रवाशांना बसच्या प्रतीक्षेत विविध बसस्थानकावर ताटकळत राहावे लागले. बसेस आगारात दुपारी ४ नंतर हळूहळू परत आल्यानंतर नियमित फेऱ्या सोडण्यात आल्या. यामुळे रात्री प्रवाशांना दिलासा मिळू शकला. अशिच स्थिती बुधवारी राहण्याची शक्यता असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागू शकतो.

ST Bus आपली बसच्या फेऱ्याही बाधित

शहरातील मतदान केंद्रांपर्यंत कर्मचारी, ईव्हीएम व मतदान साहित्य पोहोचवून देण्यासाठी आपली बसची मदत घेण्यात येत आहे. शहर बस वाहतूक विभागाच्या ताफ्यातील ४२५ बसेत प्रशासनाच्या मागणीवरून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यामुळे शहरांतर्गत सार्वजनिक प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली आहे. केवळ ४७ बसेसच शहरांतर्गत सेवेसाठी उपलब्ध असून त्याद्वारे महत्त्वाच्या मार्गांवर सेवा दिली जात आहे. ऑटोचालकांकडून रस्त्यांवर आपली बसची हजेरी नाहीच्या बरोबरीत असल्याने अतिरिक्त भाडे वसूल करण्यात आले. बुधवारीही अशिच स्थिती राहणार आहे.

ST Bus आगारनिहाय उपलब्ध बसेस

आगार – बसेसची संख्या

घाटरोड – ३२

गणेशपेठ – १८

उमरेड – २५

काटोल – ४२

रामटेक – २५

सावनेर – ३७

इमामवाडा – २४

वर्धमाननगर – ३१

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img