10.9 C
New York

Bhausaheb Kamble : शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर मध्यरात्री गोळीबार, श्रीरामपूरातील घटना

Published:

श्रीरामपूर विधानसभा (Assembly Election 2024)मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena) उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर मंगळवार मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल (Shrirampur Assembly Constituency) केलीय.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, 19 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास डॉ. संजय फरगडे, जनार्धन गालपगारे, असे मातापुर येथे माझे कार्यकर्ते संजय लबडे यांच्या गाडीतील चालक चेतन तनपुरे यांचेसह मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेलो होतो. तेथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटुन आम्ही चौघे बोलेरो गाडीत बसुन रात्री एक वाजेच्या सुमारास श्रीरामपुरकडे निघालो. गाडीमध्ये चालकाच्या शेजारील सिटवर बसलेलो होतो. त्यावेळी प्रवास करत असतांना माझ्या लक्षात आलं की, दोन मोटारसायकल आमचा पाठलाग करत आहेत. त्याबाबत मी माझ्या सोबतच्या लोकांना सांगितलं. काही अंतर गेल्यानंतर रस्त्यात अशोक सहकारी साखर कारखाना, अशोकनगरचे मुख्य गेट आले.

सापळ्यामध्ये कधी चुकून माणूस अडकतो ; तावडेंवरील आरोपांवर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

संरक्षणासाठी कारखान्याच्या गेटमधुन गाडी आत घेण्यास मी चालकाला सांगितलं. चालकाने गाडी गेटकडे वळविली, परंतु त्यावेळी कारखान्याचे गेट अर्धवट बंद होते. संरक्षणासाठी कारखान्याच्या गेटमधुन गाडी आत घेण्यास मी चालकाला सांगितलं. चालकाने गाडी गेटकडे वळविली, परंतु त्यावेळी कारखान्याचे गेट अर्धवट बंद होते. त्यामुळे आमची गाडी आत जावु शकली नाही, म्हणुन चालकाने गाडी उभी केली.

त्यादरम्यान पाठलाग करणाऱ्या दोन मोटारसायकलवरील व्यक्तींनी त्यांच्या मोटारसायकल रोडच्या बाजुला उभ्या केल्या. त्या तीन व्यक्ती अंदाजे 20 ते 25 वयोगटातल्या होत्या. तसेच शरीराने सडपातळ असणारे दोघे आमच्या उभ्या असलेल्या बोलेरो गाडीच्या समोर चालत आले. त्यामुळे मी चालकाला आमची बोलेरो गाडी मागे घेवुन पुन्हा श्रीरामपुरच्या दिशेने घेण्यास सांगितली. चालक तनपुरे हा गाडी मागे घेत असतांना गाडीच्या समोरील तिघांपैकी सडपातळ बांध्याच्या एका व्यक्तीने त्याच्या कमेरला लावलेला एक पिस्टल काढुन आमच्या गाडीच्या दिशेने एक गोळी फायर केली. परंतु आमची गाडी वेगात मागे घेतल्याने ती गोळी गाडीला न लागता हवेत गेली. त्यानंतर आम्ही गाडी वेगात चालवुन श्रीरामपुरच्या दिशेने आलो. श्रीरामपुरमध्ये येवुन आम्ही माझे मित्र आणि सहकारी प्रकाश चित्ते यांच्या घरी गेलो. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला येवुन तीन अज्ञात व्यक्तींविरुध्द फिर्याद दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img