राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. यातच महाविकास आघाडीत बिघाडी करणारी बातमी सोलापुरातून आली आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठा गेम झाला आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला जोरदार धक्का दिला आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.मतदानानंतर शिंदे म्हणाले, की सोलापूर दक्षिण मतदारसंघात आम्ही अपक्ष उमेदवार धर्मराज कराडी यांना पाठिंबा देत आहोत.
मतदानाच्या दिवशी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या सोलपुरात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज कडादी यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेससोबत महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ही जागा देण्यात आली होती. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी उमेदवार उभा केला आहे. आघाडी धर्म पाळून या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने काय परिणाम होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुशीलकुमार शिंदे मतदानासाठी आले होते. मतदान करून बूथबाहेर आल्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.
परळीत मोठा राडा! मुडेंच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाच्या नेत्याला केली मारहाण
या मतदारसंघात ठाकरे गटाने रजनीकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. परंतु, आज ऐन मतदानाच्या दिवशीच सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिंदे म्हणाले, हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, ठाकरे गटाने हट्टाने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला. आम्ही माजी मंत्री दिलीप माने यांना येथून तिकीट देण्याची इच्छा व्यक्त करत होतो. परंतु, पक्षाने त्यांना चिन्ह दिलं नाही. त्यामुळे आता आम्ही येथील अपक्ष उमेदवार धर्मराज कराडी यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. कराडी हेच आता भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना मात देतील असा विश्वास सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.