10.9 C
New York

Exit Poll : राज्यात पुन्हा महायुती सरकार? भाजप सर्वात मोठा पक्ष; एक्झिट पोलचा अंदाज काय

Published:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज दिवसभरात मतदान पार पडलं आहे. (Exit Poll) राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे. या मतपेट्या आता दोन दिवसांनी म्हणजेच येत्या 23 नोव्हेंबरला मतमोजणीच्या दिवशीच उघडतील. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे प्रत्येकाचं अतिशय बारकाईने लक्ष आहे. महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली होती. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी फार कमी टक्के मतदान केलं होतं. पण त्यामानाने विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी उत्सफूर्तपणे प्रतिसाद दिल्याचं चित्र आहे. राज्यातील मतदान करणाऱ्या मतदारांचा आकडा हा अनेक ठिकाणी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 60 टक्क्यांपेक्षा जास्त बघायला मिळाला आहे

राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतर आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सरासरी टक्के मतदान झाले आहे. यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. मॅट्रीझच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येऊ शकतं. महायुती जवळपास 150 ते 170 जागा जिंकू शकते. तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळण्याची शक्यता आहे.गेल्या निवडणुकीनंतर सलग दोन ते अडीच वर्ष कोरोना संकटाने हैराण केलं. त्यानंतर राज्यात सत्तांतर घडून आलं. यानंतर राजकारणाचा अक्षरश: चिखल उडालेला बघायला मिळाला. कोण कुणाच्या बाजूने आहे, हेच स्पष्ट होईना. त्यामुळे जनता आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते देखील अनेकदा संभ्रमात पडले. पण मतदारांना आता हेच चित्र बदलवण्याची संधी मिळाली आहे.

‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा, नाना पटोलेंचा हल्लाबोल

Exit Poll एक्झिट पोलचा अंदाज काय?

पोल डायरीच्या अंदाजानुसार, महायुतीचं सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्थापन होण्याची शक्यता आहे. सर्वात मोठा फटका तर महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. पोल डायरीच्या अंदाजानुसार, 122 ते 186 जागांवर महायुतीला राज्यात यश मिळण्याचा अंदाज आहे. तर 69 ते 121 जागांवर महाविकास आघाडीला केवळ समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर इतर अपक्षांना 12 ते 29 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे

पोल डायरीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 77 ते 108 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. भाजप हा राज्यात पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला 27 ते 50 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला 18 ते 28 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला महाविकास आघाडीत सर्वाधिक जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, काँग्रेसला 28 ते 47 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाला 25 ते 39 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. सर्वात ठाकरे गटाला 16 ते 35 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img