10.9 C
New York

Assembly Election : महाराष्ट्रात आता पर्यंत कुठे किती मतदान झाले, जाणून घेऊ या ….

Published:

महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात (Assembly Election) आज मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे. आता पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात कुठे किती मतदान झाले, याची आकडेवारी समोर आली आहे.

Assembly Election मुंबईत किती टक्के मतदान?

मुंबई शहरात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.25 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक 8.31 टक्के मतदान हे मलबार हिल मतदारसंघात झाले आहे. तर धारावी मतदारसंघात सर्वात कमी 4.1 टक्के मतदान झाले आहे. धारावीत 4.71 टक्के, सायन-कोळीवाडा: 6.52 टक्के, वडाळा 6.44 टक्के, माहीम: 8.14 टक्के, वरळी: 3.78 टक्के, शिवडी : ६.१२ टक्के, भायखळा: 7.09 टक्के, मलबार हिल: 8.31 टक्के, मुंबादेवी 6.34 टक्के आणि कुलाबा: 5.35 टक्के मतदान झाले आहे.

Assembly Election पुण्यात किती टक्के मतदान?

मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यात सकाळी 9 पर्यंत 5.53 टक्के मतदान झाले आहे. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी समोर आली आहे. यात कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ 7.44%. मतदान झाले आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ 5.53% मतदान, हडपसर विधानसभा मतदारसंघ 4.45 टक्के मतदान, पर्वती विधानसभा मतदारसंघ 6.30% मतदान, खडकवासला विधानसभा मतदारसंघ 5.44% मतदान, कोथरूड विधानसभा मतदारसंघ 6.50% मतदान, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ 5.29% मतदान, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ 6.37% मतदान झाले आहे.

Assembly Election पालघरमधील मतदानाची टक्केवारी समोर

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात आतापर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. यात पालघर विधानसभा मतदान केंद्रात 5.94 टक्के, बोईसर विधानसभा 6.97 टक्के, डहाणू विधानसभा 8.5 टक्के, विक्रमगड विधानसभा 6.4 टक्के, नालासोपारा विधानसभा 7.48 टक्के, वसई विधानसभा 8.32 टक्के मतदान झाले आहे.

अजित पवार मुख्यमंत्री होणार? जय पवारांनी थेट सांगितलं, बारामतीकर….

तर सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.14 टक्के मतदान झाले आहे. यात फलटण 4.29 टक्के, वाई 4.92 टक्के, कोरेगाव 6.93 टक्के, माण 3.08 टक्के, कराड उत्तर 4.84 टक्के, कराड दक्षिण 5.63 टक्के, पाटण 4.68 टक्के, सातारा – 6.15 टक्के मतदान झाले आहे.

Assembly Election यवतमाळ आणि बीडमधील मतदान किती टक्के?

यवतमाळ जिल्ह्यातील सकाळी 9 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. यात आर्णी 8.34 टक्के, दिग्रस- 6.57 टक्के, पुसद- 6.42 टक्के, राळेगाव- 7.32 टक्के, उमरखेड- 5.60 टक्के, वणी- 9.00 टक्के, यवतमाळ- 7.20 टक्के मतदान झाले आहे. त्यासोबतच बीडमधील सहा विधानसभा मतदारसंघातील टक्केवारी समोर आली आहे. यात बीड जिल्ह्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 8.66 टक्के मतदान झाले आहे. यात आष्टी – 8.66 टक्के, बीड – 7.15 टक्के, गेवराई – 6.90 टक्के, केज – 5.81 टक्के, माजलगाव – 5.60 टक्के, परळी 7.08 टक्के मतदान झाले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img