बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील मतदान केंद्रावर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळी नऊ वाजता कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना ते म्हणाले महाराष्ट्राच्या सत्तेत अनेकदा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री चार वेळा देऊनही अजित पवारांवर अन्याय झाला असे म्हणणे कितपत योग्य आहे, अशा पद्धतीचा सवाल शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगता सभेत अजित पवार यांच्यावर अन्याय झाला, अशा पद्धतीचा खुलासा केला होता, त्यामुळे त्या मुद्द्याला अनुसरून शरद पवार बोलत होते. भारतीय जनता पार्टीच्या कुटील राजनीतीचा शरद पवार यांनी सातत्याने उल्लेख करीत महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा लागल्याचे स्पष्टपणे बोलून दाखवले.
देवाला प्रसाद चालतो,’विनोद’ नाही; तावडे प्रकरणानंतर मराठी लेखकाची पोस्ट चर्चेत
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला, सुप्रिया सुळे यांच्यावरती झालेल्या भ्रष्टाचाराचा आरोपावर शरद पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सुप्रिया सुळे यांच्यावर ज्या व्यक्तीने आरोप केले तो व्यक्ती कसा आहे याची चौकशी करावी. त्याला अधिकचे काही महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला हा दुर्दैवी प्रकार आहे.
यावरूनच भारतीय जनता पार्टीची विचाराची पात्रता दिसून येते. मला विनोद तावडे यांच्यावर झालेल्या गुन्ह्याची माहिती नाही माहिती घेऊन बोलणे आवश्यकता आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच , महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी उत्तम पद्धतीने यशस्वी होईल, अशा पद्धतीची भूमिका शरद पवार यांनी मांडली, यावेळी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, रेवती सुळे या पवार कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला.