11.2 C
New York

RSS : डोअर टू डोअर प्रचार अन् फ्री बसेस, भाजपच्या विजयासाठी RSS ने लावली संपूर्ण ताकद

Published:

राज्यात विधानसभेसाठी उद्या (20 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. या निवडणुकीत महायुती (Mahayuti) की महाविकास आघाडी (MVA) कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. हरियाणाप्रमाणे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये तर दुसरीकडे (Maharashtra Assembly Election) भाजपला विजय पुन्हा एकदा करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) देखील जोरदार प्रयत्न सुरु आहे.

या विधानसभा निवडणुकीसाठी आरएसएस आणि त्याच्याशी संबंधित 37 संघटनांनी भाजपसाठी आपले कार्यकर्ते तैनात केले आहेत. माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीसाठी आरएसएसने जुलैपासूनच आपल्या रणनीतीवर काम करण्यास सुरुवात केली होती. भाजपच्या निवडणूक प्रचाराच्या समन्वयाची जबाबदारी अतुल लिमये आरएसएसचे संघाचे सह-सरचिटणीस यांच्याकडे दिली होती. अनेक बैठका त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासोबतदेखील घेतल्या. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला शाखा राष्ट्र सेविका समितीही भाजपसाठी घरोघरी जाणून प्रचार करत होती.

राज्यात आज 4, 136 उमेदवारांचं भवितव्य पणाला; 9.7 कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क

तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी आरएसएसने कुणबी, माळी, मराठा समाजासह इतर समाजाच्या नेत्यांशी संवाद साधला. तर तरुण आणि शहरी मतदारांसाठी विशेष रणनीती भाजपकडे आकर्षित करण्यासाठी आखण्यात आली होती. याच बरोबर आरएसएसकडून आयटी क्षेत्रात आणि इतर व्यवसायात काम करणाऱ्या तरुण मतदारांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात मतदान करण्यासाठी बसेस आणि मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. आरएसएसने 100 टक्के मतदान व्हावे यासाठी अनेक योजना आखल्या आहेत.

नागपूरसारख्या प्रमुख भागात डोअर टू डोअर प्रचार करण्यात आला. रामनगरसारख्या भागात आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी मतदारांशी दोनदा संपर्क साधला. तसेच यावेळी अनेक महत्वाचे कामे भाजपसाठी आरएसएसने तिकीट वाटपापासून ते बूथ व्यवस्थापनापर्यंत पार पाडली आहे.

तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्यांदाच निवडणुकीत सर्व ताकद लावली आहे, असा दावा ज्येष्ठ संघ कार्यकर्ते दिलीप देवधर यांनी केला. त्यामुळे आरएसएसच्या या प्रयत्नांचा भाजपला किती फायदा होणार हे तर 23 नोव्हेंबर रोजीच स्पष्ट होईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img