11.2 C
New York

Supriya Sule : निवडणुकीत बिटकॉईनचा गैरवापर केल्याचा आरोप; सुप्रिया सुळेंचा संताप

Published:

महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) मतदान होत आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजे काल पुण्यातील एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर मोठा आरोप केला. या दोन्ही नेत्यांनी 2018 मध्ये बिटकॉइनचा गंडा घातला, असा आरोप माजी आयपीएसने केलाय. तो पैसा या विधानसभा निवडणुकीत वापरला जात आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय. माजी आयपीएस यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर आरोप केल्यानंतर भाजप (BJP) नेत्यांनी या मुद्द्याला उचलून धरलं आहे.

भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेऊन मतदानापूर्वी एमव्हीएवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी काँग्रेसला विचारलं की, ते कोणत्याही बिटकॉइन व्यवहारात सहभागी होते का? याशिवाय भाजप नेत्याने सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावरही आरोप केले. सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, “अत्यंत गंभीर आणि चिंताजनक तथ्ये समोर आली आहेत. ज्यामुळे एमव्हीएचा भ्रष्टाचार हळूहळू उघड होत आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांवरील हा गंभीर प्रश्न आहे.”

कॉंग्रेस नेते नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि डीलर अमिताभ यांच्यात व्हॉइस नोट्सची देवाणघेवाण झाल्याचा दावा भाजपने केला आहे. भारतीय जनता पक्षाने आरोप केल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “भाजप घाणेरडे राजकारण करत आहे. मी सुधांशू त्रिवेदी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार आहे. मी अशा कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही. माझा आवाज खोडून काढण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मतदानाच्या दिवशी युगेंद्र पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले

या आरोपांविरोधात सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाला तक्रार पत्र लिहिले आहे. सुप्रिया सुळे यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने पत्रात म्हटलंय की, “सुप्रिया सुळे यांच्या विरोधात खोटी माहिती पसरवणाऱ्या पुण्याचे माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील आणि गौरव मेहता यांच्याविरोधात सायबर फसवणुकीची तक्रार तात्काळ दाखल करण्यात यावी. पत्रात लिहिलंय की, ‘विधानसभा निवडणुकीत निधी वाटपाच्या उद्देशाने नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून बिटकॉईनचा गैरवापर होत असल्याचा आरोप ते करत आहेत. आरोपांना बळ देण्यासाठी त्यांनी सुप्रिया सुळेंचा खोटा आवाज तयार करण्याचाही प्रयत्न केला.

निवडणूक हा एक लोकशाहीचा उत्सव असतो, तो शांततेना पारदर्शकपणे व्हावा. निवडणूक आयोग पोलिस या सगळ्यांचे मी आभार मानते. पाच प्रश्न काल मला भारतीय पक्षाने विचारले, तर त्यांचे ते आरोप नव्हते. त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझा आवाज नाही, कोणीही चेक करावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. मी त्रिवेदी यांना नम्रपणे विनंती करते, ते म्हणतील ती जागा , चॅनल, शहर याठिकाणी मी जवाब द्यायला तयार आहे. क्लीप आल्यानंतर मी काल तक्रार केली आहे. जे काही खरं असेल ते बाहेर येईल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img