12.2 C
New York

Hitendra Thakur : टीप कोणी आणि कधी दिली? विरार राड्यानंतर हितेंद्र ठाकूरांचा मोठा खुलासा

Published:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वी विरारमध्ये (Virar) एक मोठी राजकीय घडामोड घडल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजप (BJP) नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर पैसे वाटण्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून (BVA) करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी मोठा खुलासा करत विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी येणार असल्याची माहिती भाजप नेतेकडून देण्यात आली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे देखील राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

विनोद तावडेंना निवडणूक आयोगाचा दणका! राजन नाईकांवरही गुन्हा दाखल…

माध्यमांशी बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, मला भाजप नेत्याकडून सांगण्यात आले की विनोद तावडे 5 कोटी घेऊन वाटप करण्यासाठी आले आहे. मात्र मला यावर विश्वास नव्हता पण दुर्देवाने ते खरं ठरलं. आज हॉटेलमध्ये पैसे आणि डायरी पकडली गेली. त्या डायरीमध्ये नाव आणि नावांसमोर किती हजार दिले अशी नोंद आहे. सकाळी अनेकांना पैसे वाटप झाले असावे आणि त्यांच्याकडे 19 लाख रुपये सापडले अशी माहिती आहे. असं माध्यमांशी बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले.

पुढे बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, बाहेरच्या नेत्यांनी मतदानाच्या 48 तासाअगोदर निघून जावे असा नियम आहे मात्र हे आज इथे काय करत होते असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच पोलिसांनी मला सांगितल्यानंतर मी त्यांना माझ्या गाडीमध्ये आणलं असं देखील ते म्हणाले. तिकडून विनोद तावडे यांना सेफ बाहेर काढण्याची जबाबदारी माझ्यावर होती म्हणून मी तिकडून त्यांना बाहेर काढलं असा खुलासा देखील त्यांनी यावेळी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img