8.3 C
New York

Assembly Election 2024 : राज्यात 15 दिवस प्रचाराचा झंझावत, कोणत्या नेत्याने किती सभा घेतल्या? वाचा सविस्तर

Published:

राज्यामध्ये मागील 15 दिवस विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) प्रचार सुरू होता. हा प्रचार सोमवारी सायंकाळी सहा वाजता संपला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा नितीन गडकरी यांनी जास्त सभा घेतल्याचं (PM Modi) समोर आलंय. यावेळी पक्षातील दिग्गजांनी उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या आहेत. कोणी नेमक्या किती सभा घेतल्या, हे पाहू या. महायुतीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी तर महाविकास आघाडीकडून राहुल गांधी (Rahul Gandhi), मलिकार्जून खरगे, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले मैदानात होते. सर्वच पक्षश्रेष्ठींनी प्रचाराचं मैदान गाजवलं आहे. पदयात्रा, भव्य शक्तिप्रदर्शन करत या सभा पार पडल्या आहेत.

दरम्यान आज दिवसभर सभा, प्रचार, मिरवणुका यांना बंदी आहे. आज उमेदवारांचा मात्र डोअर-टू-डोअर प्रचार सुरू राहणार आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी एकूण 4136 मतदार मैदानात आहेत. आतापर्यंत सर्वच स्टार प्रचारकांनी सभा गाजवल्या आहेत. उद्या सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरूवात होणार आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत. महायुतीच्या नेत्यांनी या निवडणुकीत ‘लाडकी बहीण योजने’वर बोलताना चांगलाच जोर दिला होता. तर महाविकास आघाडीकडून संविधान बचाओ चा नारा देण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्ष अत्यंत सावधगिरीने विधानसभा निवडणुकीत भूमिका बजावताना दिसून आले आहेत.

ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला; शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी काय दिली प्रतिक्रिया?

महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या सभा

नरेंद्र मोदी – 10 सभा
अमित शाह – 16 सभा
नितीन गडकरी – 72 सभा
देवेंद्र फडणवीस – 64 सभा
एकनाथ शिंदे – 75 सभा
अजित पवार – 64 सभा

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या सभा

उद्धव ठाकरे – 60 सभा
राहुल गांधी – 07 सभा
प्रियांका गांधी – 03 सभा
नाना पटोले – 65 सभा
शरद पवार – 69 सभा
सुप्रिया सुळे – 46 सभा

मनसे राज ठाकरे – 34 सभा
वंचित – प्रकाश आंबेडकर – 51 सभा

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img