8.3 C
New York

Vinod Tawde : विनोद तावडेंनी पैसे वाटले, हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप

Published:

एक दिवस विधानसभा निवडणुकीला बाकी असताना राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. विवांत या हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केले आहेत. विनोद तावडे पैशांच्या बॅग घेऊन हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांना पैसे वाटत असल्याचा आरोप करत बविआ एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना घेरलं असून भाजप आणि बविआ कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित आहेत. विनोद तावडे यांना लाज वाटायला पाहिजे. माफ करा जाऊन द्या, असं म्हणत त्यांनी मला २५ फोन केले. जे नियमाने आहे तशी कारवाई करावी. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं. मात्र, भाजपच्या नेत्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

बविआच्या कार्यकर्त्यांना विवांत हॉटेलमध्ये विनोद तावडे यांना घेरलं. यावेळी विनोद तावडे आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. व्हिडीओमध्ये पाकिटं दिसत आहेत, ती पैशांचीच आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. बविआच्या आरोपाचं विनोद तावडे यांनी खंडन केलेय. आम्ही पैसे वाटले नाहीत, असे तावडेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

हितेंद्र ठाकूर यांनी त्यांनी सांगितले की, विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा दोन डायऱ्याही सापडल्या. विनोद तावडे सांगतात की, तिकडे बैठक सुरु होती. पण मतदानापूर्वी 48 तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात, हे भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला माहिती नाही का, एवढी अक्कल तावडेंना नाही का? विनोद तावडे यांनी याठिकाणी वाटण्यासाठी पाच कोटी रुपये आणले होते. आता पोलीस याप्रकरणात काय करणार, हे बघायचं आहे. सरकार त्यांचंच आहे, त्यामुळे पुढे काही होणार नाही, असेही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले.

तुमची बायको अमितच्या बायकोला खाष्टपणा दाखवतेय का?; पेडणेकरांकडून खरपूस समाचार

Vinod Tawde अतुल भातखळकर काय म्हणाले?

पराभव समोर दिसत असल्यामुळे विरोधक असे आरोप करत आहेत, असं भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सांगितले. तुम्ही रडीचा डाव खेळू नका, लोकशाही आहे, सामोरे जावा, असं अतुल भातखळकर हितेंद्र ठाकूर यांना म्हणाले.

Vinod Tawde ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंची टीका

या घटनेनंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विनोद तावडे आणि भाजपवर प्रचंड आगपाखड केली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या हेलिकॉप्टर्समधील बॅगा तपासल्या. मग विनोद तावडे यांची बॅग तपासण्यात आली नव्हती का?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. तर भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी विनोद तावडे यांचा बचाव केला. विनोद तावडे त्याठिकाणी पैसे वाटण्यासाठी गेले नव्हते. विरोधक निवडणूक हारणार असल्यामुळे असले आरोप करत आहेत. पोलिसांना याप्रकरणाची चौकशी करु द्या. त्यानंतर तथ्य बाहेर येईल, असे प्रसाद लाड यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img