8 C
New York

Sanjay Raut : तावडेंना भाजप नेत्यांनीच पकडून दिलं, संजय राऊतांचा गंभीर आरोप…

Published:

विधानसभा निवडणुकीपूर्वी (Vidhansabha Election) भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये विरोधी पक्ष बहुजन विकास आघाडीच्या (Bahujan Vikas Aghadi) कार्यकर्त्यांनी तावडेंना घेराव घातला असून या घटनेमुळे मोठा खळबळ उडाली. दरम्यान या सगळ्या प्रकरणात विनोद तावडे (Vinod Tawde) यांना अडकवण्यासाठी भाजपमधील प्रमुख नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे भविष्यात जोडेईड होतील, या उद्देशानं त्यांना अडवकण्यात आलं. आज ते पैसे वाटतांना अडकल्याने काही लोक भाजपमध्ये आनंद व्यक्त करत असतील. भाजपमधील बहुजन चेहरा संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोप राऊतांनी केला.

विनोद तावडे अन् भाजपावर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, पटोलेंची मागणी

विरारमधील विवांत हॉटेलमध्ये पाच कोटी रुपये वाटताना तावडे यांना पकडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांना भाजप नेत्यानेच याबाबत माहिती दिल्याने ही घटना उघडकीस आली. या घटनेनंतर विरारमध्ये प्रचंड राडा झाला या राड्यानंतर विरोधी पक्षाकडून तावडे आणि भापजवर टीका करण्यात येत आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, पैसे वाटले तरच ते जिंकणार आहेत, अशी सध्या भाजपची अवस्था आहे. बाटेंगे तो जितेंगे अशी त्यांची घोषणा झाली. राष्ट्रीय सरचिटणीसांवर मोठी जबाबदारी असते. राजस्थान, चंदीगडमध्ये त्यांनी पैसे वाटले आहेत. मोदी आणि शाह यांच्या जवळचे ते माणूस आहेत. निवडणूक आयोग निःपक्षपाती असता तर त्यांच्यावर कारवाई झाली असती, असं राऊत म्हणाले.

पुढं ते म्हणाले, भाजप नेत्याला पकडण्यासाठी भाजपच्या नेत्यानेच टीप दिली आहे. भाजपकडे किती पैसे आहेत, यातून समोर आलं. गृह खात्याकडून तावडेंवर पाळत ठेवली गेली. विनोद तावडे या जाळ्यात अडकले जावेत याची सोय केली जाईल. तावडेच का हे त्यांना आता समोर येऊन सांगावे लागेल. तावडे एक बहूजन नेतृत्व आहे, त्यातून त्यांचे नाव समोर आलं, असंही राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img