विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (दि. २० नोव्हेंबर)रोजी मतदान होणार असून या निवडणुकीचा निकाल (दि. २३ नोव्हेंबर) रोजी जाहीर होणार आहे. (Eknath Khadse ) त्यामुळे या निवडणुकीकडं अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. यातचं आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं एक पत्र समोर आलं आहे.
एकनाथ खडसे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत पुढची निवडणूक मी पाहील की नाही हे ईश्वरच ठरवेल, पुढच्या निवडणुकीत मी असेल किंवा नसेल, अशी भावनिक साद एकनाथ खडसे यांनी घातली आहे. तसंच आपण आता कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणाही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
Eknath Khadse एकनाथ खडसे काय म्हणाले?
येत्या २० तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक रोहिणी खडसे लढत आहेत. निवडणूक मी यापुढे न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्ष आपल्या बरोबर आहे. आपणही मला सहकार्य केलं. मी तुमच्या सुख आणि दुःखात देखील सहभागी झालो. कोणताही धर्म आणि जात न पाहता मी आतापर्यंत मदत करण्याची भूमिका निभावली. पण तब्येतीच्या कारणास्तव या पुढची निवडणूक मी पाहील की नाही? हे इश्वरच ठरवेल. कारण पुढच्या निवडणुकीत मी असेन किंवा नसेन. पण मी आपल्याला विनंती करतो या निवडणुकीत, या निवडणुकीत रोहिणी खडसे उभ्या आहेत. रोहिणी खडसे यांनाही आपण मला जसं सहकार्य केलं तसं सहकार्य करा, एकनाथ खडसे यांनी अशी भावनिक साद जनतेला घातली आहे.
कालीचरण महाराजांच्या टीकेनंतर जरांगे पाटलांचा पलटवार, ‘टिकली लावणारे संत…’
Eknath Khadse एकनाथ खडसेंची मोठी घोषणा
महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली आहे. युती आणि आघाडीत खरं तर राज्यात राजकारण सुरु आहे. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा प्रमुख सामना पहायला मिळणार असून, निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आज मोठी घोषणा मात्र, यातच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी करत आपण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. फेसबुकवर यासंदर्भातील व्हिडीओ देखील त्यांनी पोस्ट केला आहे.