8.3 C
New York

Sanjay Raut : याला जबाबदार देवेंद्र फडणवीस; संजय राऊत यांचा आरोप

Published:

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष आमदार आणि मंत्री राहिलेले शरद पवारांचे खंदे समर्थक अनिल देशमुख यांच्यावर काल नागपूरमध्ये हल्ला झाला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केलाय.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, अत्यंत निर्घृणपणे हल्ला झाला. आपण एक चित्र पाहिलं असेल त्यांच्या डोक्यावर झालेल्या दगडफेकीमुळे ते रक्त बंबाळ झालेले आहे. हल्ला करताना भारतीय जनता पक्षाकडून झिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याचे माजी गृहमंत्री यांच्यावर ठार मारण्याचा हल्ला होतो. मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या होते. अनिल देशमुखांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना ठार मारण्याचा प्रयत्न होतो.

स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या नागपुरात हे घडणं म्हणजे, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारं आहे. त्याला जबाबदार शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस आहे. आता निवडणूक काळात राज्याच्या प्रशासनाची सर्व सूत्रं निवडणूक आयोगाकडे असतात. पण सध्या भाजपच्या गृहमंत्र्यांचा हुकूम चालतो. निवडणूक आयोग त्यांच्याच हातामध्ये असतं, ते त्यांचीच माणसं असतात आणि काम करतात. देवेंद्र फडवणीस यांनी जवाबदारी स्वीकारली पाहिजे. कायदा सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेलीय.

सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य, काँग्रेस नेते राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

उद्या सकाळपासून मतदान होणार आहे. आम्हाला चिंता वाटतेय की, आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षातल्या कित्येक कार्यकर्त्यांना धमक्या आणि हल्ले होतील. खोटे गुन्हे देखील दाखल केले जातील, याविषयी आम्हाला चिंता वाटते. हे प्रकार राज्यभरात सुरू झालेले आहे. मी आणि माझा पक्ष उद्धव ठाकरे यांनी याबाबत चिंता व्यक्त केलीय. अनिल देशमुख यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली, मी देखील केली आहे.

महाराष्ट्राला धक्का बसावा, चिंता वाटावी हे कालचं प्रकरण आहे. भाजपवाले म्हणतात, हे स्टंट आहे. नरेंद्र मोदींकडून आम्हाला स्टंट शिकण्याची गरज नाही. ही स्टंटगिरी आहे बरं का, पंतप्रधान आणि तुमचे नेते कायम करत असतात, आम्हाला गरज नाही. देशमुख यांचं डोकं किती फुटलं आहे, हे बघा. देशमुख यांचे चिरंजीव काटोल मतदारसंघातून उभे आहेत, ते निवडून येत आहेत. सात वेळा देशमुख हे निवडून आले. मला तो मतदार संघ माहित आहे. हे जे काय चाललं आहे, ते भारतीय जनता पार्टीची नौटंकी आहे. असं कधी महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये वातावरण झालं नव्हतं. देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांच्या काळात झालेलं असल्याचं आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

माजी गृहमंत्री यांच्यावर अशा प्रकारचे हल्ले व्हावेत, असं वातावरण कोणत्याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात झालं नव्हतं. हे देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहाच्या काळात झालेला आहे. मणिपूर देखील पेटलेला आहे. महिलांची धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार होत आहे. येथे मंत्र्यांवर हल्ले होत आहे. कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षेवर संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img