माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनावर अज्ञात लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली. या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. (Anil Deshmukh) नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या हल्ल्यानंतर माहिती देताना सांगितलं की, अनिल देशमुख यांची गाडी काल सोमवार रात्री ८ वाजता नरखेडपासून परत येत असताना गाडीवर दगडफेक झाली. ही घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतली असून आमचा तपास सुरू आहे.
या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कामाला लावलं आहे. मी स्वतः घटनास्थळाचा दौरा केला असून तपासावर देखरेख करत आहे. आताच काही निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही. या घटनेतील तथ्य आम्ही लवकरच समोर आणू. दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना रात्री नागपूरच्या अलेक्सिस (मॅक्स) रुग्णालयात आणलं गेलं आहे. नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदाने यांनी सांगितलं की, आम्ही रुग्णालय परिसरातही बंदोबस्त वाढवला आहे.
Anil Deshmukh सलील देशमुख काय म्हणाले?
अनिल देशमुख यांच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मी काटोलमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. वाईट पद्धतीने भाजपा प्रत्येक ठिकाणी पराभूत होत आहे. त्यामुळेच अशा पद्धतीने हल्ला करून ते लोक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विरोधात आवाज उचलणाऱ्यांचं डोके फोडले जाईल, असा संदेश यातून दिला जात आहे. काटोल, नरखेडमध्ये अशांतता पसरवण्याचाच हा प्रकार आहे, असाही आरोप सलील देशमुख यांनी केला.
उद्योजकांचं कर्ज माफ पण शेतकऱ्यांच नाही; शरद पवारांचं मोदींवर टीकास्त्र
Anil Deshmukh भाजपची टीका
एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतरचाव्हायरल होत आहे. या घटनेची माहिती कळताच राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते रुग्णालयाजवळ एकत्र झाले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. भाजपने ही ‘स्टंटबाजी’ आहे, असा आरोप केला. स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून देशमुख यांनी दगडफेक घडवून आणली, असा आरोप भाजपचे काटोल मतदार संघाचे प्रभारी अविनाश ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. काटोलमध्ये सलील देशमुख यांच्याविरुद्ध भाजपचे चरणसिंह ठाकूर यांच्यात अटीतटीची लढत आहे.