9.9 C
New York

Sharad Pawar : वय फक्त आकडा! शरद पवारांनी मैदान गाजवलं

Published:

अवघे तास राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) मतदानासाठी काही शिल्लक आहेत. मागील 15 दिवस प्रचार सुरू होता. सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या सभा थंडावल्या आहेत. बारामती मतदारसंघ हा लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी देखील चर्चेचा विषय आहे. अख्ख्या राजकीय वर्तुळाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे. काल बारामतीत शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांनी सांगता सभा घेवून प्रचार मोहिमांचा शेवट केलाय.

महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावली. प्रचारादरम्यान त्यांनी स्वत:ला केंद्रस्थानी ठेवलं. महाविकास आघाडीतील नेत्यांपैकी सर्वात जास्त सभा शरद पवार यांनी घेतल्या आहेत. 1 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता. शरद पवार यांनी या कालावधीत 69 जाहीर सभा आणि 3 पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. शरद पवार गटाला आता या सभांचा किती फायदा होईल, हे येणारी तारीखच सांगणार आहे.

अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर पोलिसांची प्रतिक्रिया; तपास करण्याबद्दल दिली माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी, ‘मी महाराष्ट्रात फिरुन पुन्हा पक्ष बांधेन’, असं वक्तव्य केलेलं होतं. हे विधान शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्षात उतरुन दाखवलं आहे. शरद पवार यांचं वय 69 आहे. परंतु शरद पवारांकडून पाहून विधासभा निवडणुकीत वय फक्त आकडा हे वाक्य खरं झाल्याचं दिसतंय. त्यांनी प्रचार मोहिमेचा शुभारंभ 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीत केला होता. 84 वर्षांचे शरद पवार यांनी राज्यभरामध्ये फिरुन राजकीय वातावरण ढवळून काढलं. ‘गद्दारांना साधसुधं नाही, तर जोरात पाडा, महाराष्ट्रामध्ये संदेश गेला पाहिजे’, असं शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

शरद पवार यांनी घेतलेल्या सभा राज्यातील अन्य नेत्यांच्या तुलनेत चर्चेचा विषय ठरतोय. शरद पवार यांनी दिवाळीमध्ये 1 नोव्हेंबर रोजी प्रचार मोहीमेचा शुभारंभ केला होता. या मोहीमेची 18 नोव्हेंबर रोजी सांगता झाली. या काळात शरद पवार यांनी 69 जाहीर सभा आणि 3 पत्रकार परिषदा घेतल्या. दरम्यान प्रतिभा पवार यांनी काल हातात घेतलेल्या एका फलकाची चर्चा होतेय. “जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय” असा आशय त्यावर लिहिलेला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img