विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आज त्यामुळे अनेक नेत्यांची भाषणंही ऐकायला मिळणार आहेत. अशातच एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते आज मोठी घोषणा करत राजकारणात आज खळबळ उडवून दिलीय. एकनाथ खडसेंनी यापुढे मी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलंय. मी गेली अनेक वर्ष आपल्यासोबत आहे. आपणही मला अनेक वर्ष सहकार्य केलंय, मला आशीर्वाद दिलेत. मीही तुमच्या सुख-दुःखात सहभागी झालेलो आहे. मी सर्वांना कोणतीही जात-धर्म न पाळता मदत करण्याची भूमिका आतापर्यंत पार पाडलीय,राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंनी अशी प्रतिक्रिया दिलीय.
रोहिणीताईंना प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्या : सध्या माझी तब्येत ठीक नसते, त्यामुळे पुढील निवडणूक मी पाहणार की नाही हे तो ईश्वरच आता ठरवेल. पुढील निवडणुकीत कदाचित मी असेन किंवा नसेनही. पण मी आपल्याला या निवडणुकीत विनंती करणार आहे की, रोहिणीताईंना आपण सर्वांनी निवडून द्यावे. मला आपण जसं सहकार्य केलं, तसं रोहिणीताईंना करावं आणि प्रचंड मताधिक्क्याने रोहिणीताईंना निवडून द्यावे ही विनंती, असं म्हणत रोहिणी खडसेंना निवडून देण्याचं एकनाथ खडसेंनी जनतेला आवाहन केलंय.
‘महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही’ ; देवेंद्र फडणवीस भरसभेत कडाडले
मुक्ताईनगर येथून एकनाथ खडसे हे विधान परिषदेवर आमदार आहेत. तसेच ते महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री होते. 2009 पासून ते 2014 पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पक्षातर्फे विरोधी पक्षनेते होते. खडसे पाटबंधारे खात्याचे 1995-99 या काळात मंत्री होते. भाजपाकडून खडसे 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर महसूलमंत्री आणि कृषिमंत्री झाले होते. तसेच पशुसंवर्धन दुग्धविकास, मत्स्यपालन, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक अशा खात्यांचेही ते मंत्री राहिलेत. 21 ऑक्टोबर 2020 रोजी एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टी सोडली. 23 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलाय. त्यानंतर परत त्यांनी भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं होतं, मात्र काही दिवसांनंतर परत ते राष्ट्रवादी शरद पवार गटात परतले होते.