विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगलेली आहे. प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलाय. परळीचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) परळी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे (Dhanajay Munde) आहेत. त्यांची काल प्रचार सभा पार पडली. या सभेत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी एक मिश्कील वक्तव्य केलंय. परंतु या वक्तव्यामुळे पंकजा यांचा रोख नेमका कोणाकडे? म्हणून राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या नजरा उंचावल्या आहेत.
भाजपा सरचिटणीस आणि विधान परिषद सदस्य पंकजा मुंडे यांनी ‘खासदार व्हायला गेले अन् आमदार झाले’ (Assembly Election 2024) असं वक्तव्य केलंय. यावेळी पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना म्हणाल्या की, “खासदार व्हायला गेले अन् आमदार झाले, मला तुमचीच नजर लागली, असं वाटत आहे. मी दिल्लीला गेल्यावर इथं लक्ष देणार नाही, असंच सगळ्यांना वाटत होतं. त्यामुळेच असं झाल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार? उद्धव ठाकरेंनी दिलं आश्वासन, म्हणाले हे षडयंत्र…
पंकजा मुंडे म्हणाल्या की, “लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना मी अर्ध्याहून अधिक लोकांच्या पाया पडत होते. त्या निवडणुकीत केवळ पाच ते सहा हजारांनी पराभव झालाय. इतक्या मतांनी झालेला पराभव हा पराभव नसतो. तुमचीच नजर लागल्याचं वाटतंय असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय. मी सतत दिल्लीला जाईल, दिल्लीला जाईल असं बोलत होते. ताई दिल्लीला गेल्या तर मग आम्ही काय करणार, इथे लक्ष घालणार नाही. असंच सगळं यांचं चाललेलं होतं. मग मी आता परत इथेच आले आहे. खासदार व्हायला गेले अन् आमदार झाले,असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझी आणि धनंजय मुंडे यांची भूमिका बदलली आहे. पूर्वी मी विधानसभेमध्ये आणि धनंजय मुंडे विधान परिषदेमध्ये होते. आता मात्र मी विधान परिषदेत आणि धनुभाऊ विधानसभेत आहेत. आता पुन्हा एकदा ते विधानसभेवर निवडून जातील. आमची भूमिका थोडी बदलली असून तुम्हाला एकाच बटनात दोन आमदार मिळाले आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.