राज्यात आजपासूवन प्रचाराच्या तोफा थंडावत आहेत. आपापल्या उमेदवारांसाठी पक्षातील दिग्गज मैदानात उतरले आहेत. भोसरीचे महायुतीचे उमेदवार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) जाहीर सभा घेतली. महेश लांडगे भोसरीचे विद्यमाना आमदार आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भोसरीकरांचा जोपर्यंत महेश लांडगे यांच्यावर विश्वास आहे, तोपर्यंत त्यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी भोसरीमध्ये बोलत होते. भोसरीकरांचा आमदार महेश लांडगे यांच्यावर विश्वास (Assembly Election 2024) आहे, तोपर्यंत त्यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस भरसभेत म्हणाले आहेत. मतदारसंघातील व्यक्तींवर महेश लांडगे यांचं प्रेम असल्याचं वक्तव्य देखील फडणवीसांनी भरसभेत केलंय.
धारावीतील जमीन हिसकावून अदानीला दिली जातेय ; राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महेश लांडगे येणाऱ्या 23 तारखेला विक्रमी मताधिक्याने तिसऱ्यांदा निवडून येणार आहेत. महेश लांडगे हे पहिलवान असून देखील हळवे आहेत. विरोधकांनी माझ्यावर केलेल्या टिकेनंतर ते हळवे झालेत, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पुढे फडणवीस म्हणाले की, महेश लांडगे यांनी विरोधकांवर टीका केलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा महेश लांडगे निवडून येतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हिंदीत एक म्हण आहे. ‘कुत्ते भोके हजार हाथी चले बजार’ असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी फेक नरेटिव्ह पसरविणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले की, 2014 ते 2019 यादरम्यान महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होता. परंतु 2020 अन् 21 मध्ये मात्र महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर गेला. पुन्हा आमची सत्ता आली अन् राज्य पहिल्या क्रमांकावर आलं. देशातील एकूण गुंतवणुकीपैकी 52 टक्के गुंतवणूक फक्त महाराष्ट्र राज्यात आहे, ही आकडेवारी आरबीआयची आहे. त्यामुळं फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, असं आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.