9 C
New York

Eknath Shinde : “मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही”; फडणवीस-पवारांनंतर शिंदेंनीही केलंं क्लिअर

Published:

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविना निवडणुकीला सामोरे जात आहेत. महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीत या मुद्द्यावर जास्त धुसफूस दिसून येत होती. परंतु, काँग्रेस आणि शरद पवार गटाने उद्धव ठाकरेंच्या मागणीला महत्व न दिल्याने हा मुद्दा मागे पडला होता. मात्र काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल असे वक्तव्य केलं होतं. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या मुद्द्यावर निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं सांगितलं होतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

आमच्यात कोणतीच स्पर्धा नाही. मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही. राज्याला पुढं नेण्याची आमची स्पर्धा आहे. राज्याला पुढं नेणं, कल्याणकारी योजना राबवणं. आता राज्याला नंबर एकवर आम्ही आणलं आहे. राज्यात विकासाचं विकेंद्रीकरण करणं, विभागनिहाय राज्याचा विकास करणं यासाठी आमची स्पर्धा सुरू आहे. मुख्यमंत्रि‍पदाच्या मुद्द्यावर निवडणुकीनंतर एकत्रित बसून काय तो निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

दरम्यान, याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावर भाष्य करताना मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही असं सांगितलं होतं. पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी भावना असणे सहाजिक आहे. मात्र वस्तुस्थिती देखील पाहणे गरजेचे असते. महायुतीचं राजकारण वास्तविकतेवर आधारीत आहे. तेव्हा मुख्यमंत्रि‍पदाची कोणतीही शर्यत आमच्यात नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमच्याबरोबर आले. त्यावेळी सुद्धा भाजपाचा मुख्यमंत्री झाला असता. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री करा अशी कोणतीही अट ठेवलेली नव्हती. मात्र एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू हे आम्ही सुद्धा दाखवून दिलं. आम्हाला सत्तेची कोणतीही लालसा नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img