9 C
New York

Latest Updates : ताज्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

Published:

“अदानींचा धारावीवर निशाणा आहे”; राहुल गांधींची पत्रकार परिषदेतून जहरी टीका

अदानींचा धारावीवर निशाणा आहे.अदानींसाठी मोदींचा “एक है तो सेफ हैं”चा नारा आहे. अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची पत्रकार परिषद सुरु आहे. त्यावेळी त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “एक है तो सेफ है”असा नारा दिला होता त्यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी तिकट शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी त्यांनी एक तिजोरी आणली. त्या तिजोरीतून अदानी आणि मोदींचे फोटो काढले. “अदानींनाच सर्व एअरपोर्ट, धारावी दिली जात आहे. अशा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अदानींवर टीका केली आहे.

आज प्रचारसभा थंडावणार; निवडणुक आयोगाची कडवी नजर

गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. निवडणुकीची घोषणा होताच राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचारांच धडाका सुरु झाला होता, मात्र आज या सर्व प्रचार सभांना ब्रेक लागणार असून सायंकाळी सहा वाजता प्रचार थंडावणार आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

आज सर्वत्र प्रचारसभा थंडावणार आहेत. मात्र त्याआधी महाविकास आघाडीच्या पंचसुत्री कार्यक्रमासाठी आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची ११ वाजता मुंबई मध्ये जाहीर पत्रकार परिषद होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचेचं लक्ष लागलं आहे.

जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

करवीर मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर रविवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून डोक्याला आणि हाताला जबर मार लागला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा आटपून घरी जात असताना अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करुन हल्ला केला. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाल्याने पोलिसांकडून शोधकार्य सुरु आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवाादन

आज हिंंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीदिन. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथील हिंंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले. लाखो शिसैनिक सकाळपासून दादर येथील स्मृतिस्थळी दाखल झाले असून बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आले आहेत.

सातारा महामार्गावरील खांबटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

सातारा महामार्गावरील खांबटकी घाट परिसरात आज सकाळी सात वाजल्यापासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या घटनेमुळे अनेक वाहनचालक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत.

 पुण्यात औंध येथे अडीच किलो सोने जप्त

पुण्यातील औंध येथील राजीव गांधी पुलावरील तपासणी नाक्यावर निवडणुकीदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अडीच किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पुढील तपास आणि कारवाई पोलिसांकडून सुरू आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर. ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी आज संवाद साधणार.

काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा आज महाराष्ट्र दौऱ्यावर कार्यक्रम आहे. त्या सकाळी ११:४० वाजता शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी १२:२५ वाजता राहाता तालुक्यातील साकोरी येथील दौलतबागेत जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी ५ वाजता त्या कोल्हापूरातील शिवाजी पेठेतील गांधी मैदानात जाहीर सभेसाठी उपस्थित राहतील. त्यांच्या या दौऱ्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img