10.4 C
New York

Aditya Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागात मोठा घोटाळा, आदित्य ठाकरेंचा आरोप

Published:

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची मातोश्री येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला. आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, अनेकांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र आम्ही राजवटीच्या विरोधात लढत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी अधोरेखित केलं. या पत्रकार परिषदेतून ‘हे आत्ताचं सरकार कॉन्ट्रॅक्टरचे आहे, अदानीचं आहे अशी टीका करत धारावीकरांना आम्ही हक्काच घरं देऊ आणि अदानी टेंडर मात्र रद्द करू, अशी ग्वाही आदित्य ठाकरेंनी दिली.

Aditya Thackeray उद्देश पाटेकरांच्या नावे चुकीचं पत्र फिरवलं जाते

मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उद्देश पाटणकर यांच्या नावे एक पत्र फिरवलं जातंय, या पत्रातून उद्देश पाटेकर यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठींबा दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र हे पत्रक खोटं असून उद्देश पाटेकर यांनी पोलिसात या संदर्भात तक्रार दिलेली आहे. यावर बोलताना ‘जर या संदर्भात निवडणूक आयोगाने कारवाई केली नाही, तर आम्ही समजू भाजपची भांडी निवडणूक आयोग घासत आहे’, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

स्वरा भास्करचे मुंबईतील अणुशक्ती नगरमधील धडाकेबाज भाषण व्हायरल

Aditya Thackeray मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागात घोटाळा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागातील घोटाळा आदित्य ठाकरे यांनी समोर आणला. यावेळी २६-१२-२०२२ MMRDA चे दोन पत्र आदित्य ठाकरेंनी दाखवले. मेट्रोच्या लाइनचे गर्डर टाकण्याआधीच रंग काम केलं केलं जातय. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७च्या रंगरंगोटीसाठीचा MMRDAने एक पत्र दिलं आहे, त्यानंतर ४ ऑक्टोबरला निविदा काढण्यात आली. यात मेट्रो पोल आणि इतर भागांना रंगरंगोटी करण्यात येईल असं म्हटलं. ७४ कोटी रुपये काम होण्याआधी रंगरंगोटीसाठी खर्च केले जात असून हे पैसे कॉन्ट्रॅक्टरच्या खिश्यात जाताय. काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा रंगरंगोटी करून पुन्हा खर्च करणार, असा हा घोटाळा असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शिवतीर्थावर पार पडली, या सभेविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘जिथे माझ्या आजोबांचं बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतिस्थळ आहे, त्या ठिकाणी त्यांची शिवतीर्थावर सभा घेण्याची हिंमत झाली. तिथे मोठी सभा आयोजित केली पण खुर्च्या रिकाम्या होत्या, फक्त खुर्च्या रिकाम्या नव्हत्या तर त्यांचं मन आणि हृदय सुद्धा रिकाम होतं’, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img