7.5 C
New York

Uddhav Thackeray : भर सभेत उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा, म्हणाले….

Published:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संपणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यापूर्वी रविवारी सभा घेतली. त्या सभेत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. नरेंद्र मोदी यांचे आव्हान स्वीकारले. उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी यांनी मला दोन दिवसांपूर्वी आव्हान दिले होते, दोन चांगले शब्द बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात राहुल गांधी यांनी बोलून दाखवावे. कालच राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी राज्यात होत्या. त्या बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात भरभरुन बोलल्या. त्यांनी भाजपचे दात घशात घातले, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Uddhav Thackeray शंभूराज देसाई यांच्यावर टीका

राज्यातील मंत्री लुटमार मंत्री आहे. थांबा सत्ता आल्यानंतर ही सर्व प्रकरणे कशी मार्गी लावतो, ते पाहा, असे उद्धव ठाकरे यांनी शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली. पाटणमध्ये उद्योग का आणले नाही? त्यांना विचारला. या लोकांना मी सर्व दिले. त्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर केला. गद्दारी करुन ते सुरतला गेले. तिकडून गुवाहाटीला गेले. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार का पाडले? असा प्रश्न त्यांनी विचारले.

…म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाहीच; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Uddhav Thackeray एकनाथ शिंदे यांचा वापर

शिंदे यांना माहीत नाही? भाजप त्यांचा वापर करुन घेणार आहे. ते फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे म्हणतात. त्यांनी जागा १७१ जागी उमेदवार उभे केले. शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन आहे. त्या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरला आहे. त्यात बाळासाहेबांचे एक वाक्य लिहिले आहे. त्यांनी म्हटले की, मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. शिवसेनेची मग कमळाबाई होईल, असे बाळासाहेब म्हणाले होते का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.

Uddhav Thackeray मुंबई अदाणींकडे जाऊ देणार नाही

कोल्हापूरमधील पाणीसुद्धा अदाणी यांना दिले आहे. विदर्भातील शाळा आणि खाणी अदानी यांना दिले आहे. ते लोक मुंबई अदानी यांच्या घशात घातली आहे. मुंबई २३ तारखेनंतर मी अदानी यांच्या घशात घातलेली काढले, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img