8.8 C
New York

 Rupali Chakankar  : विकासकामे करण्याची धमक वळसे पाटलांमध्येच; चाकणकरांनी द्विगुणीत केला विजयाचा विश्वास

Published:

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे केवळ आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघांपुरतेच मर्यादित लोकप्रतिनिधी नसून, वळसे पाटील हे राज्याचे अभ्यासू आणि कणखर नेतृत्व आहेत, त्यामुळे वळसे पाटलांना विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)  यांनी केले आहे. त्या रांजणगाव येथे आयोजित महिला निर्धार मेळाव्यात चाकणकर बोलत होत्या.

 Rupali Chakankar  विकासकामांची गंगा सुरू ठेवण्यासाठी साथ द्या

विकासकामे करण्याची धमक वळसे पाटील यांच्यामध्येच असून, शेती व पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वळसे पाटील यांना बहुमताने निवडून देवून विधानसभेत पाठवा असे त्यांनी सांगितले. राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या हिताचे आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मार्गी लागलेली विविध विकासकामे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तळागळातील नागरिकांपर्यंत पोचवावीत असे आवाहन चाकणकर यांनी केले.

‘बॅंक बंद करा, अन्यथा…’ ‘लश्कर–ए–तैयब’ चा अधिकारी बोलतोय; RBI ला धमकीचा फोन

सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपये खर्चाची विविध विकासकामे पूर्ण झाली असून, यापुढील काळातही विकासकामांची गंगा सुरू राहण्यासाठी वळसे पाटील यांना सर्वांनी खंबीर साथ द्या असे त्या म्हणाल्या.
महिलांना स्वावलंबी करण्याचे काम महायुतीने केले.

महिलांचे महत्त्वपूर्ण मार्गी लावण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. एवढेच नव्हे तर, महायुती सरकारच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे काम या सरकारने केल्याचे त्या म्हणाल्या. महायुती सरकारमुळे मुलींना मोफत उच्चशिक्षण मिळणार असून, महिलांच्या संरक्षणासाठी शक्ती विधेयक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img