विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) मतदान तोंडावर आलंय. आता राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांचा एक व्हिडिओभाजप नेत्या चित्रा वाघ यांनी (Chitra Wagh) देखील त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया X अकाऊंटवरून शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये नितीन राऊत म्हणत (Nitin Raut Video) आहेत, केवळ ‘जय भीम’ म्हटलं त्यामुळे विलासराव देशमुख यांनी मंत्रीपद दिलं नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच फिरत आहे.
भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा किशोर वाघ यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, काँग्रेसची संस्कृती नेहमीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहे. एका भाषणामध्ये काँग्रेसचे नेते नितीन राऊत सांगतात, की केवळ ‘जय भीम’ म्हटले म्हणून विलासराव देशमुखांनी मंत्री केले नाही. अहो, नितीनजी यात नवीन काय आहे ? प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या काँग्रेसवाल्यांनी दोनदा निवडणुकीमध्ये पाडले, त्यांच्याकडून कसली अपेक्षा करता? यांचा मूळ चेहरा आरक्षणविरोधी, मागासवर्गीयांच्या विरोधी आणि फक्त मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारा आहे, त्यांच्याकडून तुम्हालाच काय भारतात कोणालाच न्याय मिळणार नाही. पूर्वीपासून हीच काँग्रेसची संस्कृती असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
मनोज जरांगे यांची भावनिक साद, म्हणाले ‘माझ्या समाजाचा लढा…’
कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच फिरत आहे. यामध्ये नितीन राऊत यांनी थेट वक्तव्य केलंय, की केवळ जय भीम बोलल्यामुळे त्यांचं मंत्रीपद गेलंय. यावरून आता चित्रा वाघ यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. कॉंग्रेस पक्षाकडून देशात कोणालाच न्याय मिळणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वेळा कॉंग्रेसने निवडणुकीत पाडलं, असा आरोप वाघ यांनी केलाय.