7.5 C
New York

Uddhav Thackeray : …म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाहीच; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Published:

राज्याच्या राजकारणामध्ये आतापर्यंत अनेक युती आणि आघाडी झाल्याच्या पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता २०१९ च्या सत्तानाट्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या बैठका झाल्याचा खुलासे आता नेतेमंडळी करत आहेत.विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार दिले आहेत. राज ठाकरे प्रचार (Raj Thackeray) सभा या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेत आहेत. उद्धव ठाकरेंवर या सभांतून जोरदार (Uddhav Thackeray) टीका करत आहेत. त्यामध्ये आतले आणि बाहेरचे अशा सगळ्यांचा समावेश आहे, असे वक्तव्य मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं होतं. आता उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत राज ठाकरेंबाबत मोठा खुलासा केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं असं कार्यकर्त्यांना नेहमीच वाटतं. मात्र मनसेसोबत (MNS) युती का नाही केली याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत दिलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे की मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे. मग महाराष्ट्राचा लुटारू मुख्यमंत्री होणार असेल तर त्याला त्यांचा पाठिंबा असेल तर त्यांच्यासोबत माझी युती होऊ शकत नाही. माझं नातं महाराष्ट्राशी आहे. महाराष्ट्र लुटला जात आहे हे मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. लुटारुंना मतदान म्हणजे मी महाराष्ट्राशी विश्वासघात करण्यासारखं आहे. त्यामुळे ज्यांनी महाराष्ट्राशी विश्वासघात केला त्यांच्यासोबत युती करणार नाही.

नितीन राऊतांचं वक्तव्य; चित्रा वाघ यांनी केला व्हिडिओ शेअर

Uddhav Thackeray नेमकं काय म्हणाले उध्दव ठाकरे?

दोन ठाकरेंनी एकत्र यावं असं महाराष्ट्रातील जनतेला वाटतं वैयक्तिक कौटुंबिक मुद्दे काही मुद्दे आहेत काही वेळेला इगो चा विषय आहे त्यामुळे ते होऊ शकत नाही का किंवा तुमचं स्वतंत्र नातं नसतं तर तुम्ही एकत्र आला असतात का? उद्धव ठाकरे या प्रश्नावर बोलताना म्हणाले असं नाही. मुख्यमंत्री पदाबद्दल मी जसा तुम्हाला सांगितलं महाराष्ट्राचे लुटारू नकोत बरोबर आहे, जाहीर त्यांनी ते केलेला आहे. मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे, मग जर तो महाराष्ट्राचा लुटारू मुख्यमंत्री होणार असेल आणि त्यांचा पाठिंबा त्याला असेल तर माझी त्यांच्याशी युती होऊ शकत नाही. एक तर मी माझं धोरण स्पष्ट केले आहे. तसं त्यांनी देखील त्यांचा धोरण स्पष्ट करावं. हे पाहिलं पक्षाचा नेमकं नाव काय आहे, मनसे आहे का गुण असे आहे ते त्यांनी ठरवावे असं एक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

मी कधीही कोणाशी विश्वासघात करत नाही. २०१४ ते २०१९ माझी एकही गुप्त मीटिंग अदानी असताना नसताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत झाली नाही. २०१९ मध्ये मी आयुष्यात पहिल्यांदा यांनी धोका दिल्यावर सोनिया गांधी यांच्याशी बोललो. शरद पवार हे बाळासाहेबांचे मित्र होते, घरी आले तरी फक्त बघायचो पण वयाचं अंतर असल्याने बैठकीत बसलो नाही, राजकीय चर्चा ही २०१९ झाली. मी भाजपच्या कारभाराबद्दल मी बोलत होतो पण मी महाविकास आघाडीचे सरकार बनवण्याचा प्रयत्न केला नव्हता, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img