8.8 C
New York

Kirit Somaiya : मुस्लिम संघटनांचं महाविकास आघाडीसोबत मिळून वोट जिहाद सुरू; सोमैय्यांचा खळबळजनक आरोप

Published:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Election 2024) राजकीय वर्तुळातून अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी मुस्लिम आणि मुस्लिम संघटनांवर गंभीर आरोप केलेत. मुस्लिम व्होट बँकेचं राजकारण करत असल्याचा आरोप किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांनी केलाय.

यावर प्रतिक्रिया देताना किरीट सोमैय्या म्हटले की, मौलाना खलीलूर रहमान सज्जाद नोमानी यांच्या विरोधात चौकशी सुरु झाली आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी काल रात्री माझं बोलणं (Kirit Somaiya Allegations On Muslim Organisation) झालंय. परभणीचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी तपास सुरु केला आहे. आज रात्रीपर्यंत ते आपला अहवाल निवडणूक आयुक्तांना पाठवणार असल्याची माहिती किरीट सोमैय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिलंय.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी सोमैय्या यांनी राज्यात व्होट जिहादच्या मुद्द्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दावा केलाय की, काही मुस्लिम गट, विशेषत: ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ आणि ‘उलेमा कौन्सिल’ काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) यांच्याशी हातमिळवणी करून व्होट बँकेचे राजकारण करत आहेत. या संघटना मुस्लिमांना भाजपच्या विरोधात एकत्र करत आहेत. यावेळी सोमैय्या म्हणाले की, जे मुस्लिम भाजपसोबत आहेत त्यांना हुक्का पाणी बंद करा.

यावेळी सोमैय्या म्हणाले की, महाराष्ट्रात व्होट जिहादचा नियोजनबद्ध प्रयत्न केला जातोय. जे भाजपसोबत आहेत त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे, असं अलीकडे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यासह काही उलेमा संघटना आणि मुस्लिम गटांना प्रेरीत केलंय.. मुस्लिम समाजाने भाजपच्या विरोधात मतदान करावे, असंही सोमैय्या उघडपणे म्हणाले आहेत. या संस्थांच्या कामात मनी लाँड्रिंगचा संशय असून, निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यावे, असा आरोपही किरीट सोमैय्या यांनी केलाय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img