विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात (Assembly Election 2024) पुन्हा ‘काका विरूद्ध पुतण्या’ असा संघर्ष दिसतोय. मतदारसंघात पार्थ पवार विरूद्ध अजित पवार असे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. निवडणुकीचा प्रचार अखेरचा टप्प्यात आलाय. यावेळी प्रचार सभेत त्यांनी लोकसभा निवडणुकीत तुम्ही पवार साहेबांना साथ दिली, आता मला द्या अशी भावनिक साद देखील घेतली आहे. यावेळी मात्र एक मुद्दा मांडत अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर वक्तव्य केलंय.
यावेळी अजित पवार शरद पवार यांच्यावर वक्तव्य करत म्हणाले की (Baramati), परवा साहेब म्हणालेत, मी तीस वर्षे काम केलंय, आता पुढच्याला संधी द्या. पवारांशिवाय दुसरा कोणी आहे का नाही? असा प्रश्न देखील अजित पवार यांनी उपस्थित केलाय. काही दिवसांपूर्वी हाच प्रश्न महादेव जानकर यांनी उपस्थित केला होता. अजित पवार म्हणाले की 100 वर्ष एकाच घरात संधी, सगळं एकाच घरामध्ये मग बाकीच्यांनी काय करावं? गोट्या खेळाव्यात का ? असं देखील अजित पवार म्हणाले आहेत. ज्या व्यक्तीला संधी मिळते त्याच्यात कर्तृत्व गाजवण्याची धमक असावी लागते, याचा माळेगावकरांनी विचार करावा, असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय.
प्रियंका गांधींचा गडचिरोलीच्या भाजपावर जोरदार हल्लाबोल
अजित पवार माळेगावात बोलाताना म्हणाले की, दीड वर्षानंतर मी राज्यसभा वगैरे जाणार नाही, बाजूला राहणार आहे असं आदरणीय साहेब म्हणालेत. परंतु यानंतर मगा बारामती तालुक्याला कोण पुढे नेईल, असा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केलाय. तुम्ही लोकसभेत साहेबांना पाहून सुप्रियाला मतदान केलंय, विधानसभेला आता मला मतदान करा अशी भावनिक साद देखील अजित पवार यांनी बारामतीकरांना घातलेली आहे.
Ajit Pawar पवार कुटुंबियांमध्येच उमेदवारी का?
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामती मतदारसंघातील काटेवाडी कण्हेरी येथे एका आठवड्यापूर्वी जोरदार भाषण केलंय. यावेळी जानकर यांनी सत्ता केंद्र पवार कुटुंबियातच कसं? असा देखील सवाल उपस्थित केला होता. अजित पवार बाजूला झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. त्यावर जानकर यांनी शरद पवार यांनी पवार कुटुंब सोडून इतर कुणाला का उमेदवारी दिली नाही? असा देखील सवाल उपस्थित केला होता.