7.5 C
New York

Sharad Pawar : राष्ट्रवादीचा CM होणार का? शरद पवारांचं एकाच वाक्यात उत्तर

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Elections) धामधूम सुरू आहे. प्रचाराचा धुराळा उडाला आहे. स्टार प्रचारक आणि नेते विजयाचा दावा करत आहे. किती जागा जिंकणार? कुणाचं सरकार येणार? याची भाकि‍तंही केली जात आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad Pawar) भाष्य केलं आहे. शरद पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीत काही ना काहीतरी परिणाम नक्कीच होईल पण फार परिणाम होणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितलं.

निवडणुकीत आघाडी आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याबाबत तर्क लावले जात आहेत. याबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी एकाच वाक्यात उत्तर देत या प्रश्नाला उत्तर दिलं. मी काही ज्योतिषी नाही. निकालानंतर पाहू किती जागा येतील असे उत्तर त्यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असा प्रश्न विचारल्यावर शरद पवारांनी पुन्हा मी काही ज्योतिषी नाही असं उत्तर दिलं.

लाडकी बहीण योजनेचा परिणाम होणार पण..; पवारांनी सांगितला राज्याचा ‘मूड’

Sharad Pawar लाडकी बहीण योजनेचा परिणाम होईल पण..

शरद पवार म्हणाले, आताची जी निवडणूक आहे या निवडणुकीत वेगळी स्थिती आहे. आज सत्ता ज्यांच्या हातात आहे त्या सत्ताधारी पक्षाला लोकसभा निवडणुकीत जो फटका बसलाय त्याची त्यांनी अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे. गंभीर दखल घेतली म्हणजे त्यांनी काय केलं तर लोकांना अधिक खूश करता येईल अशा योजना सुरू केल्या. त्याची उपयुक्तता किती आहे, किती दिवस टिकेल याची माहिती असली तरी आज वेळ मारून न्यायची आणि निवडणुका जिंकायच्या हे त्यांचं सूत्र आज मला दिसतंय.

लाडकी बहीण योजनेत जवळपास दोन कोटी महिलांना त्यांनी दीड हजार रुपयांप्रमाणे पैसे दिले आहेत. आता इतके पैसे वाटले म्हटल्यानंतर त्याचा परिणाम काही ना काहतरी नक्कीच होईल पण फार परिणाम होईल असं काही मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की एका बाजूला तुम्ही महिलांना मदत केलीत पण दुसऱ्या बाजूला राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img