7.5 C
New York

Yogesh Kadam : उद्धव ठाकरे यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला होता; योगेश कदमांचा प्रचार सभेत थेट घणाघात

Published:

शिवसेना दुभंगल्यानंतर ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे कोकणातील मोठा नेता एकनाथ शिंदे यांच्यासोबत (Yogesh Kadam ) गेल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठ खिंडार पडल्याचं बोललं जात होत. दरम्यान, योगेश कदम हे विधानसभेच्या रिंगणात आहेत. त्यांनी आज प्रचार सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला. ते प्रचार सभेत बोलत होते.

शिवसेना म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे शिवसेना असं एक नात होत. परंतु, हे नात जपण्यात उद्धव ठाकरे कमी पडले. त्याचाच परिणाम म्हणून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं नेतृत्व केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात आम्हला निधी मिळाला नाही. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळाला. हा न्याया पक्षाचे लोक असताना आम्हाला उद्धव ठाकरे देऊ शकले नाहीत अशा शब्दांत शिंदे शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

आर आर आबांच्या मुलासाठी शरद पवार मैदानात

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला होता असा थेट घणाघात योगेश कदम यांनी केला. त्याचबरोबर, एकनाथ शिंदे यांनी जी शिवसेना उभी केली त्यावेळी सर्व नगरसेवक यांच्यापासून पदाधिकाऱ्यांपर्यंत कुणीही वेगळा निर्णय घेतला नाही. ते सर्वजण आपल्यासोबत असल्याचंही योगेश कदम यावेळी म्हणाले आहेत. तसंच, एकनाथ शिंदे यांच्यामुळे कोकणातील दापोली, खेड या परिसराचा विकास होऊ शकला. अन्यता आमचा भाग भकास झाला असता असा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला.

गेली पाच वर्षात मी कायम कोकणातील लोकांसाठी काम करण्याचं काम केलं. त्यामुळे येणारे पाच वर्ष हे, उद्योगांचे, व्यावसायाचे, तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे, महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे, रोजगारासाठी इतर शहरात स्थलांतर झालेल्या तरुणांना आपल्याच गावाजवळ रोजगार उपलब्ध करून देणयाचे असतील असा शब्द योगेश कदम यांनी यावेळी उपस्थित मतदारांना दिला. यावेळी नागरिकांनी सभेला मोठ्या प्रमाणा गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img