7.5 C
New York

Otur : चैतन्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली मतदान जागृती

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.१५ नोव्हेंबर ( रमेश तांबे ) 

येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र (Otur) विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून मतदान जागृती करण्यात आली.

१९५ जुन्नर विधानसभा निवडणूक अशा प्रत्येक अक्षरावर विद्यार्थ्यांना योग्य अशा फॉर्मेशन मध्ये बसवून विशिष्ट रचना करून मतदान जागृती करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. यामध्ये सुमारे पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. लोकशाही मध्ये मतदारांचा कौल अतिशय महत्त्वाचा असतो. मतदान हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे ते त्याने प्रामाणिकपणे बजावले पाहिजे अशा प्रकारचा संदेश या विद्यार्थ्यांनी दिला. यासाठी मुख्याध्यापिका राजश्री भालेकर,विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक संतोष कांबळे, अमित झरेकर, विशाल चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ईश्वर ढमाले,  दीपक हांडे ,अरविंद आंब्रे यांनी या कामी सहकार्य केले. या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, संजय हिरे, संतोष सोनवणे यांनी कौतुक केले.या सर्वांनी मार्गदर्शक शिक्षकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img