8.2 C
New York

Sharad Pawar : आर आर आबांच्या मुलासाठी शरद पवार मैदानात

Published:

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे तासगावचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. (Rohit Patil ) महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आल्या आहेत. या राज्याचा कारभार कुणाच्या हातात द्यायचं याचा निकाल घेण्याची निवडणूक आहे असं म्हणत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार घणाघात केला.

आठ दहा महिन्यांपूर्वी देशाची निवडणूक झाली. त्या देशाचा कारभार हाती घ्यायचा हे सूत्र घेऊन नरेंद्र मोदी देशात फिरत होते. ते जाईल त्या ठिकाणी सांगत होते मला चारशे जागा द्या. लोकसभेचं काम चालवायचं असेल, सरकारचं काम चालवायचं असेल तर पावणे तीनशे जागा असतील तर काम सहज करता येतं, असं शरद पवार म्हणाले.

नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मी संरक्षण मंत्री होतो. त्या सरकारमध्ये आमच्याकडे 250 पेक्षा कमी खासदार संख्या होती. तरी सुद्धा 5 वर्ष राज्य चालवलं. लोकांचे प्रश्न सोडले त्यासाठी चारशे जागांची गरज नव्हती. मोदी साहेब चारशे पार का सांगतात याबाबत शंका मनात होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली त्यात बदल करायचे असतील तर त्याला मोठी संख्या आवश्यक असते असही ते म्हणाले.

आजचे राज्यकर्त्यांच्या मनात वेगळा विचार असल्यानं त्यांच्याकडून चारशे जागांची मांडणी केली जात होती. त्यामुळं आम्ही सर्वांनी एकत्र बसून निकाल घेतला. देशात काही झालं तरी चालेल 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल आम्ही घेतला. राज्य त्यांचं आलं पण घटनेत बदल करायची ताकद त्यांची राहिली नाही, असं शरद पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img