7.5 C
New York

Sharad Pawar : शरद पवारांनी ‘वोट जिहाद’वरून फडणवीसांना झापलं

Published:

निवडणुकीत वोट जिहाद होत असल्याचा आरोप भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जातो. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं आहे. जिहाद हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी काढला. काही मतदारसंघात मायनॉरिटीने महाविकास आघाडीने मतदान केलं. पुण्याच्या काही भागात विशिष्ट समाज आहे. हिंदू समाज आहे. त्यांनी भाजपला मतदान केलं तर आम्हाला सवय आहे. असंच होतं. पण याचा अर्थ जिहाद होतो असं नाही. फडणवीस यांनी जिहाद शब्द वापरला. फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीला धार्मिक कलर देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला यश येणार नाही याची खात्री झाल्याने हिंदू मुस्लिम विषय घेऊन बोलत आहेत. हिंदू आणि मुस्लिमांमधील वातावरण खराब करत आहे, असं शरद पवार म्हणालेत.

मी अनेक पंतप्रधानांची भाषणं ऐकली. निवडणुकीच्या काळात. मी कॉलेजात शिकत असताना नेहरुंचे भाषण पुण्यात ऐकलं. त्यानंतर सर्व पंतप्रधानांची भाषणं ऐकली. साधारण उद्याचा विकास कसा असेल. काय कार्यक्रम असेल हे मांडतात. हे पहिले पंतप्रधान मोदी आहेत त्यांनी सुरुवातच केली ४०० पारची. ४०० पार कशासाठी?, अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांवर टीका केली आहे.

लाडकी बहीण योजनेचा परिणाम होणार पण..; पवारांनी सांगितला राज्याचा ‘मूड’

नरसिंहराव पंतप्रधान होते. आमची मेजॉरीटी नव्हती. त्यांना बहुमत नव्हतं. तरीही सरकार चालवलं. सरकार चालतं. तरीही मोदी ४०० पार मागत होते. याचा अर्थ त्यांचे सहकारी घटनाबदलाचं बोलत होते. संविधानात दुरुस्तीबद्दल बोलत होते. त्यामुळे आम्हाला लोकांना सांगावं लागलं की सरकार काय करणार आहे. आपल्याला भूमिका घ्यायला पाहिजे, असं पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img