विधानसभा निवडणुकांची धामधूम राज्यात (Maharashtra Elections) सुरू आहे. यातच आता धनंजय मुंडे परळी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार यांच्या एका (Dhananjay Munde) वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. इच्छुकांची रांग आपल्याविरुद्ध लढण्यासाठी लागली होती. पण तुतारीचा उमेदवार जाहीर होण्यास उशीर होत होता. तेव्हा मीच आपणच एका नेत्याला फोन करून लवकर उमेदवार फायनल करायला सांगितलं होतं, असं विधान धनंजय मुंडे यांनी केलं आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदूर येथे आयोजित प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुंडे पुढे म्हणाले, माझ्या विरोधात लढण्यासाठी एवढे जण तयार झाले. त्यात काही तुतारीचे निष्ठावंत होते. ते सगळे मतदारसंघात फिरायला लागले. त्यांचे नेते येतील त्यांना कामाला लागा अशा सूचना देत होते. काही जणांच्या बाबतीत असं घडलं. त्यामुळे मलाच त्यांची काळजी वाटू लागली. काही झालं तरी तिकीट यापैकी एकालाच कुणाला तरी मिळणार होतं. तेव्हा मग मीच तुतारीच्या एका नेत्याला फोन लावला आणि त्यांना सांगितलं की लवकर उमेदवार फायनल करा.
आर आर आबांच्या मुलासाठी शरद पवार मैदानात
माझ्या विरोधात उमेदवारी करण्यासाठी अनेक जण उतावीळ झाले. त्यांच्या नेत्यांना विचारून मतदारसंघात फिरायला लागले. नेतेही त्यांना म्हणायचे तिकीट तुम्हालाच. एका घरातून तिघं.. एवढ्यावरच थांबले नाहीत. अनेकजण नडायला लागले. मलाच त्यांची पण 12 ते 13 जण इच्छुक असल्याचे लक्षात येताच काळजी वाटू लागली. यांपैकी कुणाला एकालाच तिकीट मिळणार होतं. मग बाकीच्यांचं काय. तेव्हा मग मीच तुतारीच्या एका नेत्याला मीच फोन लावला आणि म्हटलं तिकीट लवकर फायनल करा..