विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) प्रचार शिगेला पोहचलेला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका उमेदवाराला प्रचार थांबवावा लागलाय. प्रचारासाठी आता केवळ दोन दिवस उरलेले आहेत. पैठण मतदारसंघातील महायुतीचे शिंदेसेनेचे उमेदवार विलास भुमरे असे असतानाच (Vilas Bhumre) यांना दुखापत झालीय. विलास भुमरे घरी भोवळ येऊन पडल्यामुळे त्यांचे हात-पाय फॅक्चर झालेत.
आज पहाटे पाचोड येथील राहत्या घरी विलास भुमरे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार (hinde Group) यांना भोवळ आलीय. त्यामुळे ते जमिनीवर कोसळले. त्यांना चार ठिकाणी फॅक्चर झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
“मीच तुतारीच्या नेत्याला सांगितलं अन् माझ्याविरुद्ध..”; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने खळबळ
विलास भुमरे यांच्यावर शस्त्रक्रिया केलेली जाणार आहे. विलास भुमरे खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार विलास भुमरे यांच्या डाव्या हाताला अन् पायाला फ्रैक्चर झालंय. या दुखापतीमुळे त्यांना आता भुमरे यांना प्रचारात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द देखील करावे लागलेत. ऐन शेवटच्या टप्प्यात प्रचार आला असतानाच ही घटना घडलीय.
दरम्यान, पैठण मतदारसंघामध्ये मागील पंधरा दिवसापासून दोघेही भुमरे पिता-पुत्र रात्रंदिवस प्रचार करत आहेत. संदिपान भुमरे खासदार झाल्यानंतर पैठणमधून विलास भुमरे यांना महायुतीकडून शिवसेनेची उमेदवारी मिळालीय. ते यापूर्वी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि बांधकाम सभापती देखील होते. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दत्ता गोर्डे रिंगणात आहेत.