तुळजापूर विधानसभा निवडणूक निमित्ताने बेंबळी येथे भाजप उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रचार सभा संपन्न झाली. बेंबळीकरांनी नेहमीच विकासाला, प्रगतीला साथ दिली आहे. (Ranajagjitsinh Patil) ही साथ यापुढेही कायम असेल व पुन्हा एकदा महायुतीचा प्रचंड विजय होईल असा विश्वास यावेळी राणा पाटील यांनी व्यक्त केला.
धाराशिव जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या अनेक प्रकल्प आणि योजनांचे काम महायुती सरकारने साकारले आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीला जे जमले नाही, ते महायुतीने करून दाखवले आहे. केवळ तालुक्याचाच नव्हे, तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आवश्यक असलेले ऐतिहासिक निर्णय यापूर्वीच महायुतीने सरकारने घेतले आहेत. त्यामुळे आता तालुक्याचा आणि जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असंही पाटील यावेळी म्हणाले.
आर आर आबांच्या मुलासाठी शरद पवार मैदानात
तत्कालीन ठाकरे सरकारच्या विरोधी भूमिकेमुळे रखडलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन प्रकल्पाच्या दुरूस्तीला महायुती सरकारने रु.११३ कोटी रूपयांच्या दुरूस्ती प्रस्तावास मान्यता दिली आहे. माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील साहेब यांनी पूर्ण केलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या दुरुस्तीची जबाबदारी आपण घेतली होती. दुरुस्तीसाठी लागणाऱ्या खर्चामुळे अशक्यप्राय वाटणारे हे काम आता महायुती सरकारमुळे पूर्णत्वास जाणार आहे असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
शेतकर्यांना कर्जमाफी, वीजबिल माफी महायुती सरकारनेच दिली. मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले, लाडक्या बहिणींना महिन्याला १५०० रूपये लाभाची योजना सुरू केली. त्यामुळे विरोधकांना अडीच वर्षात महायुती सरकारने काय केले, हे विचारण्याचा नैतीक अधिकार राहिला नाही. नळदुर्गला बसवसृष्टी उभारली जात आहे, तुळजापुरात अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक, बौध्द विहार, नळदुर्ग येथे शादीखान्याचे भूमिपूजन केले. अशा अनेक महत्त्वपूर्ण विकास जिल्ह्यात घडत आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.