8.3 C
New York

Devendra Fadnavis : हे चिंताजनक, मराठा समाजाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Published:

मराठा समाज कायमच हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिला असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीकडून मला खलनायक ठरविण्याचा प्रयत्न झाला. (Devendra Fadnavis ) मराठा समाजातील ८० टक्के जनता हिंदुत्ववादी असून २० टक्के पुरोगामी असावेत. पण मराठा समाजाला आरक्षण, सारथी संस्था, समाजाच्या मंडळांना भरीव आर्थिक तरतूद यामुळे मराठा समाजाची मला सहानुभूतीच आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. ते एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत बोलत होते.

पारंपरिकदृष्ट्या ८० टक्के मराठा समाज हा हिंदुत्ववादी विचारांचा आहे. या समाजाने कायम हिंदुत्वाचा पुरस्कार करत महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीतही मराठा समाज हा पारंपरिकदृष्ट्या महायुतीच्या मागे खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. जातीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात दरी निर्माण होणं हे चिंताजनक आहे. समाजांत मराठा आणि ओबीसी दरी निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहणाऱ्या या दोन समाजांमध्ये दुरावा निर्माण होणे हे राज्याला परवडणारे नाही असंही ते म्हणाले.

“भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना, पण मी..”, फडणवीसांनी काय सांगितलं?

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत आरक्षण रद्द करणार आणि घटना बदलणार हे खोटे कथानक पसरविले होते. आता हे दोन्ही मुद्दे गौण ठरले आहेत. विदर्भात दलित आणि आदिवासी मतदारांचे प्रमाण सरासरी ३२ टक्के आहे. हे दोन्ही समाजखोट्या कथानकामुळे लोकसभा निवडणुकीत आमच्या विरोधात गेले होते. विदर्भात महायुतीला आता हे दोन्ही समाज पाठिंबा देतील. यामुळेच विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या नेमके विरोधी चित्र बघायला मिळेल. मराठवाड्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालात जमीन-अस्मानाचा फरक पडलेला बघायला मिळेल असंही ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत आमचा दारुण पराभव झाला हे मान्यच करावं लागेल. कारण महाराष्ट्रातून अधिक यशाची अपेक्षा होती. ती अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकलो नाही. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी पक्षाच्या नेतृत्वाकडे राजीनामा देऊ केला होता. मला सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करा अशी विनंती मी पक्षाला केली होती. पण पक्षाने माझी मागणी मान्य केली नाही. याउलट लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतरही पक्षनेतृत्वाने माझ्याकडे नेतृत्व सोपवलं. भाजपच्या वतीने ही निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढली जात आहे. यावरून पक्षाच्या नेतृत्वाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे असंही ते यावेळी म्हणाले.ो

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img