5.1 C
New York

Devendra Fadnavis : शरद पवारांचं पत्र अन् ; फडणवीसांच्या दाव्याने खळबळ!

Published:

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातच आता राज्याचे उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्या राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे शरद पवार यांचं पत्र जबाबदार होतं असा दावा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आता त्यांनी थेट शरद पवार यांच्याबाबत केलेल्या दाव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

2019 मध्ये राजकारणात अशी परिस्थिती होती की सरकार स्थापन करण्या इतपत संख्याबळ भाजपकडे नव्हतं. त्यामुळे आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही. यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केलं. मात्र त्यांच्याकडेही बहुमत नव्हतं. पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेतली आणि सांगितलं की राष्ट्रवादी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास इच्छुक आहे. यानंतर एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीत मी स्वतः, अजित पवार, शरद पवार, अमित शहा, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. त्या बैठकीत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली आणि सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

“भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना, पण मी..”, फडणवीसांनी काय सांगितलं?

राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी त्यानंतर सरकार स्थापन करू असंही या बैठकीत ठरलं होतं. कारण, 10 नोव्हेंबरच्या आत सरकार स्थापन झालं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल हे स्पष्टच होतं. याच दरम्यान शरद पवार राज्याचा दौरा करतील आणि स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येतील अशी घोषणा करतील असं ठरलं होतं. विशेष म्हणजे, हे सर्व शरद पवार यांच्या सूचनेनुसारच ठरलं होतं, असा दावा फडणवीस यांनी या मुलाखतीत केला होता.

राज्यात राष्ट्रपती राजवट कशी लागू झाली याची माहिती देताना फडणवीस म्हणाले, राज्यपालांनी भाजप, शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केलं होतं. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन करायचं नाही असा निर्णय घेतला होता. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेलं पत्र महत्वाचं होतं. ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप झालं होतं. या पत्रावर सही करण्याआधी यात त्यांनी काही बदल सुचवले होते. आता जर पवार साहेब म्हणत असतील की राष्ट्रपती राजवट लागू होण्यात त्यांच्या योजनेचा काही भाग नव्हता खरंतर त्यांच्या पत्रामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली होती, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img