भारतात पायाभूत क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक मिळवणाऱ्या शहरांत जी काही मोजकीच शहरं आहेत त्यात ठाणे आहे. शहराचा विकास वेगाने होतोच आहे. शिवाय सर्वांगीण विकासामुळे ठाण्याचा नावलौकिकही वाढतो आहे. नवीन मेट्रो मार्गिका, बुलेट ट्रेन, एक्सप्रेस वे, उड्डाणपूल आणि बोगदे या 3.96 लाख कोटींच्या प्रकल्पांचा फायदा फक्त ठाणे शहरालाच नाही तर आसपासच्या भागालाही होणार आहे. यामुळे ठाणे शहर मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) मध्यवर्ती उपनगर म्हणून उदयास येईल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाणे शहर आणि आसपासच्या भागात दिलेल्या योगदानाचं हे प्रतीक नक्कीच म्हणता येईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र याआधी 2004 ते 2009 पर्यंत त्यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. आताही हे 34 प्रकल्प एकतर ठाण्यातून सुरू होत आहेत किंवा ठाण्यातून जात आहेत. यातील काही प्रकल्प असे आहेत ज्यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीची समस्या बऱ्याच अंशी कमी होणार आहे. मागील दहा वर्षांच्या काळापासून एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत. या काळात त्यांनी महत्वाची खाती सांभाळली आहेत. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळच्या शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सारख्या उपक्रमांचा समावेश त्यांच्या कार्यक्षेत्रात होता. नोव्हेंबर 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. तेव्हा या सरकारमध्येही एकनाथ शिंदे यांच्याकडे बांधकाम खातं होतं. नगरविकास मंत्रालयाचीही अतिरिक्त जबाबदारी त्यांना देण्यात आल होती. ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. जून 2022 मध्ये राज्यात पु्न्हा महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं. एकनाथ शिंदे या सरकारचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्रिपदाबरोबरच त्यांनी आधीची दोन्ही मंत्रालये राखली आहेत.
महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे, दिलीप वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन आणि बजेट वाटप ठाण्यासाठी फायदेशीर ठरले आहे. येथील रियल इस्टेट उद्योगालाही बूस्ट मिळाला आहे. ज्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकापासून दूर असलेल्या क्षेत्रांमध्ये गृह खरेदीदारांना प्रकल्पांचे आकर्षण सांगता येईल. “पायाभूत सुविधांच्या विकासामुळे सहाय्यक उद्योगांना चालना मिळते, व्यवसायाच्या संधी वाढतात, रोजगार निर्मिती होते, रिअल इस्टेटमध्ये वृद्धी होते, आणि मालमत्तांच्या किंमती वाढतात. या सर्वांमुळे स्थानिक GDP देखील 15-18 टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा आहे.”
Eknath Shinde ठाणे शहरात सर्वाधिक गुंतवणूक
एका रिअल इस्टेट उद्योग-संबंधित अभ्यासानुसार, ठाणे हे भारतातील पायाभूत सुविधांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक मिळविणाऱ्या शहरांपैकी एक आहे. पुणे, नागपूर, हैदराबाद, गुरुग्राम, आणि नोएडा या इतर प्रमुख शहरांमध्येही अशाच प्रकारे गुंतवणूक होत आहे. ठाणे शहरासोबतच शेजारील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, मुंब्रा, आणि कळवा या ठिकाणीही प्रकल्पांची अंमलबजावणी होणार आहे.