5.1 C
New York

Devendra Fadnavis : त्यावेळी राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागली? फडणवीस म्हणाले

Published:

2109 या वर्षाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी घडली. या वर्षात अनेक वेगवान घडामोडी घडल्या. अल्पघटिकेचं सरकार अस्तित्वात आलं. त्यापूर्वी राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली. तर त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यालाच नाही तर देशाला राजकारणातील चमत्कार दाखवला. त्यानंतरच्या अडीच वर्षातही राजकारणात अनेक मोठे धक्के बसले. पण या सर्व घडामोडींना कारणीभूत असलेली राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागू झाली या मुद्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा बॉम्बगोळा टाकला आहे.

Devendra Fadnavis शरद पवार यांच्यावर निशाणा

शरद पवार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे 2019 मध्ये राज्यपालांना पत्र पाठवले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट त्यामुळेच लागू झाली, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दावा फडणवीस यांनी हे पत्र आपल्याच कार्यालयात टाईप करण्यात आले, असा केला.त्यांनी हा खुलासा एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

Devendra Fadnavis काय म्हणाले फडणवीस?

” त्यावेळी भाजपाकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा नव्हत्या. आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही. राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृ्त्वाखालील शिवसेनेला सरकार स्थापण्यसाठी बोलावलं. त्यांच्याकडंही बहुमत नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी दरम्यान माझी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत सरकार स्थापन करू इच्छित असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर लागलीच एक बैठक झाली. त्या बैठकीला मी, अमित शहा, शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय त्या बैठकीत घेतला होता.” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.

‘भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना, पण मी..’, फडणवीसांनी काय सांगितलं?

Devendra Fadnavis पत्र माझ्या कार्यालयात टाईप केलं

राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी पवारांची सूचना होती. त्याप्रमाणे या गोष्टी घडल्याचे फडणवीस म्हणाले. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेले पत्र हे महत्त्वाचं होतं. आपल्याच कार्यालयात ते पत्र टाईप करण्यात आलं होतं. पवारांनी या पत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्यात काही बदल सूचवले होते. आता शरद पवार जर राज्यात राष्ट्रपती राजवट करणे हे त्यांच्या योजनेचा भाग नव्हता असे म्हणत असले तरी त्यांच्या पत्रामुळेच ती लागू झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img