महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने शुक्रवारी (15 नोव्हेंबर) (Raj Thackeray) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा मुंबई वांद्रे येथील MIG क्लब येथे आज प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जाहिरनाम्यातून मनसे आपली भूमिका महाराष्ट्रासमोर मांडली. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. हे जनतेचे प्रश्न असल्याने ते सोडवण्यासाठी आम्ही काम करु, असे आपल्या जाहीरनाम्यात प्रसिद्धी पत्रकात राज ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमका या जाहीरनाम्यातून महाराष्ट्राला आणि मतदाराला काय आश्वासन-दावे आहेत, ते जाणून घेऊया…
Raj Thackeray शिवतीर्थावर मनसेची 17 तारखेला सभा होणार की नाही
यावेळी जाहीरनामा प्रसिद्ध करताना राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला मनसेची सभा होणार की नाही यावर भाष्य केलं. सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. 18 नोव्हेंबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे 17 नोव्हेंबरच्या संध्याकाळी होणारी बैठक महत्त्वाची होती. आता वांद्रे एमआयजी क्लबमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतरच सभा घेणार, नाही का? यावर भाष्य केलं. त्यांनी यावेळी सांगितले की,शिवाजी पार्कवरच 17 तारखेला सभा आहे. पण ती आता होती म्हणावी लागेल. सरकारकडून कारण त्यासाठी जी परवानगी मिळणं आवश्यक असतं, ती अजून मिळालेली नाही. फक्त दीड दिवस सभेसाठी उरला आहे. त्यात सभा करणं कठिण झालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यामुळे 17 नोव्हेंबरची सभा रद्द करत आहोत” असं सांगितलं.
मुंबई मोदींच्या प्रचार सभेला अजित दादा गैरहजर, नेमकं महायुतीत काय सुरु आहे ?
Raj Thackeray मनसेच्या जाहीरनाम्यातील प्रमुख 10 मुद्दे
मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान
दळणवळण वीज पाण्याचे नियोजन
सक्षम स्थानिक प्रशासन प्रकल्पासाठी लोकसहभाग
राज्याची औद्योगिक प्रगती
मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार
गडकिल्ले संवर्धन
कृषी आणि पर्यटन क्षेत्राचा विकास
राज्याचे करत धोरण सुधारणार
डिजिटल प्रशासनाला प्रोत्साहन
घनकचरा व्यवस्थापन आणि मलनि:सा