“आम्ही काय करु” मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध
वांद्रे येथील एम.आय.जी क्लब येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यात, मुलभूत गरजांसह महिला सुरक्षेचा मुद्दा आहे त्याचबरोबर प्रशासनापासून उच्च शिक्षणापर्यंत मराठी असणं गरजेचं आहे. १९ वर्षात आम्ही काय केलं यावरही पुस्तिका काढली आहे.२०१४ मधील ब्लू प्रिंट मधूल अनेक गोष्टी आताच्या जाहीरनाम्यात आहेत.त्याचबरोबर “आम्ही काय करु”अशा आशयाचा मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध आहे.तुम्ही ज्यांना मतं दिलयं ते कुठे आहेत ते बघा. ‘जगातून कुठून उद्योग आले तर महाराष्ट्राला प्राधान्य मिळतं’. असं हे म्हणाले.
आज “मनसे”चा जाहीरनामा प्रसिद्ध होणार; काय असणार घोषणा ?
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार काही दिवसांमध्ये थंडावणार आहे. तत्पूर्वी भाजप आणि महाविकास आघाडीचा जाहीरनामा हा प्रसिद्ध करण्यात आला त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाचा जाहीरनामा देखील आज प्रसिद्ध होणार आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व येथे एम.आय.जी क्लब मध्ये मनसेच्या नेत्यांसह आपल्या पक्षाचा जाहीरनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रसिद्ध करणार आहेत, मात्र मनसेच्या जाहीरनाम्यात नेमक्या कोणत्या घोषणा असणार आहेत याकडे सर्वांचेचं लक्ष लागलं आहे.
“मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही”; फडणवीसांचा मोठा दावा
“मी राज्याचा मुख्यमंत्री व्हावा अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पण आता मुख्यमंत्री होणे हे सर्व माझ्यासाठी गौण आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची कोणतीही शर्यत नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही.”असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात त्यांनी”मुख्यमंत्री”पदाबाबत मोठं विधान केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत एक विधान केलं होतं, मात्र स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याचे संकेत दिल्याने चर्चांना अधिक उधाणं आलं आहे.
जोगेश्वरी राडा प्रकरण: ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला अटक
शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचा मातोश्री क्लब बाहेर राडा आणि त्यांचा महिला कार्यकर्त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे एका शिवसैनिकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
खासदार रवींद्र वायकर यांच्या चार महिला कार्यकर्त्यांचा ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी मातोश्री क्लब बाहेर राडा मध्ये विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये चार शिवसैनिकांचा विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणांमध्ये एमआयडीसी पोलिसांनी ठाकरे गटाचे शिवसैनिक विलास जाधव याला अटक केली आहे.
भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यलयात हल्ला
कल्याणध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यलयात हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जुगल उपाध्याय भाजपचे सोशल मीडिया संयोजक आहेत. उपाध्याय यांच्या कार्यलयात येऊन दोघांनी मारहाण करत केली तोफफोड झाली.
विधानसभेसाठीचा मनसेचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार
विधानसभेसाठीचा मनसेचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते उद्या प्रसिद्ध होणार आहे.\
माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन
भाजपचे नेते आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन झालय. गेल्या अनेक वर्षांपासून हरिश्चंद्र चव्हाण दुर्धर आजार अशी लढत होते.