5.3 C
New York

Ajit Pawar : मुंबई मोदींच्या प्रचार सभेला अजित दादा गैरहजर, नेमकं महायुतीत काय सुरु आहे ?

Published:

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत राज्यात पाहायला मिळणार आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडत आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यातच काल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटची सभा मुंबईत पार पडली. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मात्र या सभेला गैरहजर होते. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची शेवटची सभा पार पडली. मुंबईतील दादर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ ही सभा पार पडली. या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. जातीच्या नावावर महाविकास आघाडीवाले लोकांना लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईकरांनामहाविकास आघाडीच्या राजकारणापासून सावध राहा असं आवाहन केलं.

अखेर विखे पाटलांच्या लढाईला यश! श्री साई बाबा मंदिरातील फुलांची बंदी उठवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचाराच्या शेवटच्या सभेसाठी महायुतीच्या घटक पक्षातील सर्व नेते उपस्थित होते. मात्र यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी दांडी मारली. नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते यात सहभागी झाले नाहीत. तसेच राष्ट्रवादीचे मुंबईतील उमेदवार सना मलिक, नवाब मलिक आणि झिशान सिद्दीकी हे देखील अनुपस्थितीत होते. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. या सभेसाठी शिवसेना (शिंदे गट) आणि रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआयसह महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थितीत होते.

Ajit Pawar पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“विधानसभा निवडणुकीसाठी ही माझी शेवटची सभा आहे. निवडणुकीदरम्यान मी सगळ्या महाराष्ट्राचा दौरा केला. प्रत्येक भागातल्या लोकांशी माझं बोलणं झालं आणि आता मी आमच्या मुंबईमध्ये आहे. सगळ्या महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुती सोबत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचं कर्तव्य असतं की देशाला आपल्या पक्षापेक्षा वर ठेवावे. भाजपचे महायुतीची हीच नीती आहे पण महाविकास आघाडीवाल्यांसाठी देशाच्या वर त्यांचा पक्ष आहे. महाविकास आघाडीला देश पुढे जातो तेव्हा दुःख होतं. भारताच्या प्रत्येक यशावर आघाडीवाले प्रश्न उपस्थित करतात. याच लोकांनी अनेक वर्षे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही. महाविकास आघाडीच्या राजकारणापासून त्यामुळे तुम्हाला सावध राहायचं आहे,” असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img