केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 ला (Pradhan Mantri Awas Yojana) मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता या योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (EWS)/निम्न उत्पन्न गट (LIG)/मध्यम उत्पन्न गट (MIG) कुटुंबांचा समावेश करण्यात येणार आहे. ज्याच्या मोठा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.
या निर्णयानंतर तब्बल 1 कोटी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 अंतर्गत 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना राज्य/केंद्रशासित प्रदेश/प्राथमिक कर्ज देणाऱ्या संस्था (PLI) मार्फत पाच वर्षांमध्ये शहरी भागात घर बांधण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी केंद्रीय सहाय्य प्रदान करणार आहे. या योजनेअंतर्गत 2.30 लाख कोटींची मदत केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी आधारित बांधकाम (BLC), भागीदारीतील परवडणारी घरे (AHP), परवडणारी भाडे गृहनिर्माण (ARH) आणि व्याज अनुदान योजना (ISS) यांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी त्यांच्या पात्रतेनुसार आणि निवडीनुसार चार घटकांपैकी एक घटक निवडू शकतात.
समृद्ध अन् विकसित ठाणे.. CM एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नांचं मोठं यश
Pradhan Mantri Awas Yojana व्याज अनुदान योजना
35 लाखांपर्यंतच्या घरांसाठी 25 लाखांपर्यंत गृहकर्ज घेणारे लाभार्थी 12 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी पहिल्या 8 लाखांच्या कर्जावर 4 टक्के व्याज सबसिडीला पात्र असणार असल्याची माहिती देखील सरकारकडून देण्यात आली आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना 1.80 लाखांची सबसिडी 5-वार्षिक हप्त्यांमध्ये पुश बटणाद्वारे जारी करण्यात येणार आहे.