10.6 C
New York

Sunil Shelke : तुम्ही निदान शब्द तरी द्या; सुनील शेळकेंचा हल्लाबोल

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैऱी झडत आहेत. आता सुनील शेळकेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मी मावळ तालुक्यासाठी 4, 158 कोटी रुपयांचा विकास निधी आणून दाखवला, तुम्ही निदान 8 हजार कोटी रुपयांचा निधी आणण्याचा शब्द तरी मावळच्या जनेतला द्या, असं खुलं आव्हान सुनील शेळकेंनी (Sunil Shelke) विरोधकांना दिलं. ही निवडणूक जनतेच्या विकासाची आहे, महायुतीला मत म्हणजे विकासाला मत, असंही यावेळी शेळके म्हणाले.

मंगळवारी आमदार शेळके यांनी नवलाख उंब्रे, बधलवाडी, परिटवाडी, जाधववाडी, मिंडेवाडी, सुदुंबरे या गावांमध्ये प्रचार दौरा करत जनसंवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ठिकठिकाणी वाजत – गाजत, फटाके फोडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शेळके म्हणाले की, आपल्या प्रचार दौऱ्यात प्रत्येक गावात मतदारांकडून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. मी मावळ तालुक्यासाठी 4, 158 कोटी रुपयांचा विकास निधी आणून दाखवला, तुम्ही निदान 8 हजार कोटी रुपयांचा निधी आणण्याचा शब्द तरी मावळच्या जनेतला द्या, असं खुल आव्हान शेळकेंनी विरोधकांना दिलं.

आमदार शेळके म्हणाले की, परीटवाडीतील विकासकामांसाठी आपण सुमारे 9.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. निवडणुकीनंतर गावातील मंदिरासाठी देखील भरीव मदत करण्याचे आश्वासन शेळकेंनी दिले. यावेळी तुकाराम पापळ, संदीप पापळ, भगवान बदले, सागर जाधव आदी मान्यवरांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नळदुर्गमध्ये नितीन गडकरींनी केलं आवाहन, म्हणाले

Sunil Shelke जाधववाडीत मताधिक्याचा निर्धार…

जाधववाडीतही आमदार शेळके यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी अर्जुन जाधव, सोसायटीचे अध्यक्ष तानाजी जाधव, उपाध्यक्ष बबन जाधव, प्रसिद्ध गडा मालक किरण जाधव, उद्योजक चंद्रकांत जाधव, ग्रामपंचायत सदस्य गोरख काळोखे यांच्यासह मनोहर जाधव, मुरली जाधव, राजू जाधव व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी जाधववाडीत आमदार शेळके यांना विक्रमी मते मिळवून देण्याचा निर्धार केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img