8.3 C
New York

Uddhav Thackeray : महाविकास आघाडीत CM कोण होणार? उद्धव ठाकरे म्हणाले

Published:

प्रत्येक दिवशी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नवनवीन मुद्दे समोर येतात. त्यात एक मुद्दा जास्त चर्चिला गेला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोघेही मुख्यमंत्री कोण यावरून एकमेकांना चिमटे काढण्याची संधी सोडत नाहीत. या मुद्यावरून दोघांचा एकमेकांवर हल्लाबोल सुरू आहे. मुद्यावरून दोन्ही गट या एकमेकांना सारखे चिमटे काढत असतात. आता महायुतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदावरून मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी एक पक्का फॉर्म्युला सांगीतला आहे.

Uddhav Thackeray आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून कोणतेही मतभेद नसल्याचे म्हटले आहे. आमच्या तीनही घटक पक्षात या मुद्दावरून कोणताही वाद नसल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. मुख्यमंत्री महायुतीमधील गद्दार कोण होणार हे आता सांगू शकतील का असा सवाल त्यांनी केला. त्यांनी महायुतीवर आगपाखड केली.

Uddhav Thackeray कोणताच फॉर्म्युला नाही, पण…

यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण याविषयी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या एका वक्तव्याचा आधार घेतला. शरद पवार यांनी सांगितले की, ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री होईल. कोणताही फॉर्म्युला आमच्याकडे याविषयीची निश्चित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘त्या’ बैठकीला अदानी नव्हते, मध्यस्थीही नाही; दादांचा २४ तासांच्या आत यू टर्न

Uddhav Thackeray ताणतणाव ही मोठी गोष्ट नाही

महाविकास आघाडीचीच गोष्ट नाही. पण जेव्हा कोणतीही आघाडी, युती होते. तेव्हा प्रत्येक पक्षाला जास्त जागा हव्या असतात. त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू असतात. आम्ही आघाडी यासाठी करतो की सर्व जण सत्तेत यावेत. जागाबाबत थोडाफार ताणतणाव दिसतोच. पण त्यामुळे आघाडी तुटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी महायुतीवर तोंडसुख घेतले. त्यांच्याकडील गद्दारांच्या फौज आहे, त्यातील कोण सीएम होणार असा सवाल त्यांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री कोण होणार ते पाहावे, आमच्यात तोंड खूपसू नये असा टोला पण त्यांनी लगावला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img