8.3 C
New York

Ajit Pawar : पवार कुटुंबातील कटुता कधी दूर होणार? अजित दादा म्हणाले

Published:

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबात उभी फूट पडली. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही पवार कुटुंब समोरा-समोर उभे ठाकले आहे. एकमेकांवर टीका-टीप्पणी होत आहे. त्यामुळे पवार कुटुंबात कटुता निर्माण झाली आहे. ही कटुता कधी दूर होणार? यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे.

एका वृत्तपत्राला अजितदादांनी मुलाखत दिली आहे. तेव्हा, अनेक राजकारणात दूर झालेली अनेक घराणी पुन्हा एकत्र आली आहेत. मतभेद धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातही होते. मात्र, आता ते एकत्र आले आहेत. पवार कुटुंबात जी कटुता निर्माण झाली आहे, ती भविष्यात दूर होईल का? असं अजितदादांना विचारण्यात आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कात सभा;वाहतुकीत मोठे बदल

या प्रश्नावर अजितदादांनी मोजक्या वाक्यात उत्तर दिलं आहे. “ पवार कुटुंबातील कटुता दूर होईल, मला असं वाटत नाही. त्यादृष्टीनं मी विचार केला नाही,” अजितदादांनी असं म्हटलं आहे. शरद पवारांशी पक्षात फूट पडल्यानंतर बोलणं झालं का? असं विचारल्यावर अजितदादा म्हणाले, “जास्त कधी संबंध आला नाही. मी माझ्या कामता आणि ते त्यांच्या कामात व्यस्त असतात.

सुप्रिया सुळे आणि तुमच्या पक्षात फूट पडण्यापूर्वी संघर्ष होता का? असं विचारल्यावर अजितदादा म्हणाले, “आधी आमच्यात तसा संघर्ष कधीच नव्हता. आमच्या पक्षात फूट पडली नाही. सगळे आमदार म्हणत होते, आपण सरकारमध्ये जाऊ, पहिल्या अडीच वर्षात काहीच कामे झाली नाही. दीड वर्ष कोरोनात गेली. त्यानंतर कुठे कामे सुरू झाली, त्यात परत विरोधी पक्षात बसायचे म्हटले तर त्या सगळ्या मंजूर कामांना स्थगिती दिली गेली. त्यामुळे विकासाकरिता, महाराष्ट्राच्या भल्याकरिता सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img